इंटरव्यूमध्ये 50 वेळा नापास झालेल्या तरुणीला Google ने दिली 1 कोटींची नोकरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. तुमची स्वप्ने कधीतरी नक्कीच पूर्ण होतील. अशीच एक घटना बिहारमध्ये घडलेली आहे.

येथील संप्रीती यादव या 24 वर्षीय तरुणीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर मोठी कामगिरी केली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा संप्रिती यादव सलग 50 मुलाखतींमध्ये अपयशी ठरली.

त्यावेळी तिच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. मात्र प्रयत्नांती परमेश्वर, अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. जे लोक प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत.

त्यामुळे संप्रीती यादवने देखील प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर सर केले. संप्रीतीला गुगलने 1.10 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर केले आहे. ज्याचा संप्रीतीने स्वीकार केला आहे.

संप्रितीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांनाही तिचा अभिमान वाटत आहे. संप्रीती यादव 14 फेब्रुवारीपासून गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहेत.

त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवणे संप्रीतीसाठी इतके सोपे नव्हते.

यासाठी तिने परीक्षेच्या 9 फेऱ्या पार केल्या आहेत. गुगलने संप्रीतीच्या मुलाखतीच्या 9 फेऱ्या घेतल्या. या सर्व फेरीत संप्रीतीने प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यानंतरच गुगलकडून एवढ्या मोठ्या पॅकेजसह संप्रीतीला नोकरीची ऑफर मिळाली.