Government Scheme News : मोदी सरकारची भन्नाट योजना! फक्त 5000 रुपयांमध्ये उघडा मेडिकल स्टोअर, जाणून घ्या सविस्तर


देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचा देशातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. आता तुम्ही देखील मोदी सरकारच्या योजनेतून ५ हजार रुपयांमध्ये मेडिकल स्टोअर खोलू शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme News : मोदी सरकारकडून देशभरातील नागरिकांसाठी अनेक योजना सादर केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा फायदा होत आहे. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकारकडून चांगली संधी दिली जात आहे.

केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्सहान म्हणून अनेक योजना सादर केल्या जात आहेत. या योजनांमधून व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

मोदी सरकारकडून अगदी कमी पैशांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र सुरु करण्याची संधी दिली जात आहे. देशभरात प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्राची संख्या वाढत आहे. तसेच याद्वारे देशातील लोकांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.

आतापर्यंत अनेक औषध केंद्रे उघडण्यात आली आहेत

मोदी सरकारकडून देशामध्ये आतापर्यंत 9,400 हून अधिक प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. तसेच प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून मदत केली जात आहे.

केंद्र सरकारकडून आता देशामध्ये आणखी २ हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामधील १ हजार जनऔषधी केंद्रे ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरु करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार जनऔषधी केंद्रे वर्षअखेरीस सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे देशातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. या जनऔषधी केंद्रामध्ये नागरिकांना स्वस्त औषधे देण्यात येत आहेत. यामध्ये 1800 प्रकारची औषधे आणि 285 वैद्यकीय उपकरणे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणच्या औषधांवर ५० ते ९० टक्के सूट दिली जात आहे.

तुम्ही 5,000 रुपयांमध्ये अर्ज करू शकता

जर तुम्हालाही जनऔषधी केंद्र उघडायचे असेल तर तुम्हाला त्याची ५ हजार रुपये भरावे लागतील. मात्र यासाठी अर्जदाराकडे फार्मा किंवा बी. फार्मा प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा असणे देखील आवश्यक आहे. तुमच्याकडे असलेल्या जागेचे क्षेत्रफळ सुमारे 120 चौरस फूट असावे.

सरकार आर्थिक मदत करते

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडल्यानंतर सरकारकडून प्रोत्साहन म्हणून रकमेच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 5 लाख रुपयांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 15,000 रुपयांपर्यंतच्या औषधांच्या मासिक खरेदीवर 15 टक्के प्रोत्साहन देण्याचा नियम केंद्रात करण्यात आला आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
फार्मासिस्ट नोंदणी प्रमाणपत्र
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा

ही अर्ज प्रक्रिया आहे

janaushadhi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवरील मेनूमधील Apply For Kendra या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पानावरील Click Here To Apply या पर्यायावर क्लिक करा.
आता साइन इन फॉर्म उघडेल, ज्याच्या खाली Register now पर्याय निवडा.
हे केल्यानंतर, नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल, त्यात मागितलेली माहिती भरा.
यानंतर, ड्रॉप बॉक्समध्ये राज्य निवडा आणि आयडी-पासवर्ड विभागात पुष्टीकरण संकेतशब्द प्रविष्ट करा.
यानंतर तुम्हाला नियम आणि अटींवर टिक करा आणि नंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा.
आता PM जन औषधी केंद्रासाठी तुमची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.