भारत

PM Scholarship Yojana : मस्तच! विद्यार्थ्यांनो मोदी सरकार दरमहा देणार 3000 रुपये शिष्यवृत्ती, तर 15 एप्रिलपर्यंत असा करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Scholarship Yojana : मोदी सरकारकडून देशातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनांचा देशातील लाखो विद्यार्थी, शेतकरी आणि जनतेला फायदा होत आहे. आता मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

देशात असे काही विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत मात्र त्यांच्याकडे पुढील शिक्षण करण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना मोदी सरकारकडून दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तयामुळे विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकतात.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून गरीब आणि गरजू मुलांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कोणताही आर्थिक अडथळा निर्माण होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना पदवीच्या अभ्यासासाठी दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल.

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करता यावी यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती.

इतकी मिळते मदत

शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना २५०० रुपये आणि मुलींना ३००० रुपये प्रति महिना दिले जातात. त्यामुळे पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. शिक्षणासाठी आर्थिक लाभ मिळत असल्याने गरजू विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकत आहेत.

या तारखेपर्यंत अर्ज करा

विद्यार्थी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2023 साठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. सरकारकडून १५ एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात अली आहे. पीएम शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना वार्षिक 36,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी पात्रता

यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीत किमान ६० टक्के गुण असावेत. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे फक्त ६० टक्के आणि त्यापेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थीच लाभ घेऊ शकतात.

कोण अर्ज करू शकतो

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी, आसाम रायफल्स, आरपीएफ आणि आरपीएसएफ जवानांची मुले अर्ज करू शकतात.
नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची मुले या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
दहशतवादी किंवा नक्षलवादी हल्ल्यात अपंग झालेल्या जवानांची मुलेही अर्ज करू शकतात.

Ahmednagarlive24 Office