भारत

Diabetes Preventative Treatment : मस्तच ! आता मधुमेह होणारच नाही, मधुमेहावरील या औषधाला मंजुरी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Diabetes Preventative Treatment : बदलत्या काळात अनेकांना गंभीर आजार होत आहेत. बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार याला कारणीभूत ठरत आहे. मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मात्र मधुमेहावर अजूनही ठोस औषध बाजारात आले नव्हते.

मात्र आता अमेरिकेत मधुमेहावर औषध आले आहे. त्यामुळे आता मधुमेहावर उपचार होणे शक्य आहे. अमेरिकेने टाइप-१ मधुमेहावरील पहिल्या प्रतिबंधात्मक उपचाराला मान्यता दिली आहे.

औषध प्रोव्हेनबिओ आणि सनोफी कंपनीने हे औषध तयार केले आहे. Tzield असे या औषधाचे नाव आहे. टाइप-१ मधील मधुमेहावर हे औषध काम करते. Tzield बनवणारी फार्मा कंपनीने दावा केला आहे की, या औषधाचे सेवन केल्याने कोणालाही मधुमेह होणार नाही. या औषधाला यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेटर (USFDA) ने नोव्हेंबर 2022 मध्ये मान्यता दिली आहे.

पूर्वीच्या मधुमेहावर ठोस औषध नव्हते

टाइप-१ मधुमेह ही स्वयंप्रतिकार प्रतिक्रिया मानली जाते. ही प्रतिक्रिया स्वादुपिंडातील पेशी नष्ट करते ज्या इन्सुलिन बनवतात. त्यांना बीटा पेशी म्हणतात. लक्षणे दिसण्यापूर्वी ही प्रक्रिया महिने किंवा वर्षे चालू राहू शकते.

हे टाइप 2 मधुमेहापेक्षा वेगळे आहे. टाईप 2 मधुमेह कालांतराने प्रामुख्याने जीवनशैलीमुळे विकसित होतो. त्याआधी टाईप-१ मधुमेहावर प्रतिबंधात्मक उपचार नव्हते.

या वयोगटातील लोकांना होणार या औषधाचा फायदा

या औषधाचा उपयोग ८ वर्षांपुढील व्यक्तींना होणार आहे. कंपनीकडून या वायोटाच्या पुढील व्यक्तींनाच या औषधाची मंजुरी देण्यात आली आहे. या औषधाने मधुमेह टाळता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office