जबरदस्त! व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आणतय ‘असे’ काही; वाचा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप अ‍ॅप आणि वेबसाठी व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलिंग फीचरवर काम करीत आहे आणि ते लवकरच युजर्सना उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

फेसबुकच्या मालकीची व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच काळापासून आपल्या वेब वापरकर्त्यांसाठी कॉलिंग फिचर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. कित्येक महिन्यांपर्यंत डेवलप केल्यानंतर, आता हे फिचर लवकरच येणार आहे.

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल फिचर आता बीटामध्ये उपलब्ध असून सध्या चाचणी चालू आहे.

व्हाट्सएपवर कॉल करण्यासाठी साइन अप करण्याची गरज नाही :- एकदा हि टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, व्हॉट्सअॅप वेब यूजर्स डेस्कटॉपद्वारे व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करण्यास सक्षम असतील.

एकदा हे फीचर आल्यावर व्हॉट्सअ‍ॅप वेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप्स झूम, गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीमला कडक स्पर्धा देईल.

बरेच लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहेत आणि इतर अ‍ॅप्सच्या विपरीत, व्हॉट्सअ‍ॅपवर साइन अप करण्याची आवश्यकता नाही. या कारणास्तव, अन्य प्लॅटफॉर्मपेक्षा व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉलिंग अधिक लोकप्रिय होऊ शकते.

अशा प्रकारे आपल्याला कॉल करावा लागेल :- अहवालानुसार एकदा हे फीचर लाइव झाले की व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल आल्यानंतर व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवर वेगळी विंडो पॉप अप होईल.

कॉल करण्यासाठी, वापरकर्त्यांनी चॅट ओपन करून टॉपवर उजवीकडे व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलचा पर्याय निवडावा. हे मोबाईल अ‍ॅप्सद्वारे कॉल करण्यासारखेच आहे.

व्हॉट्सअॅप सध्या अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी ग्रुप कॉलमध्ये आठ सदस्यांना परवानगी देतो. बर्‍याच काळापासून जगभरातील व्हॉट्सअॅप यूजर्स या फीचरची मागणी करत होते.

हे वैशिष्ट्य बीटा वर्जनमध्ये पाहिले गेले आहे, परंतु कंपनी अधिकृतपणे त्याचे लाँचिंग कधी जाहीर करेल किंवा सद्यस्थिती काय आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24