देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्यांनतर सर्वच सेवा बंद करण्यात आल्या. या लॉक डाऊनमुळे दिल्ली विमानतळावर अडकून पडलेला जर्मनीमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी सापडला आहें.
धक्कादायक म्हणजे तो ५४ दिवसांपासून तेथे राहत होता. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झीटमध्ये ४० वर्षीय एडगार्ड झीबॅट हा व्यक्ती मागील ५४ दिवसांपासून राहत आहे.
एडगार्ड हा व्हिएतनामहून व्हिएटजेट एअरच्या विमानाने १८ मार्च रोजी दिल्लीत दाखल झाला. इस्तंबूलला जाणारे विमान पकडण्यासाढी एडगार्डने दिल्लीमध्ये हॉल्ट घेतला होता. मात्र याच दिवशी भारताने तुर्कीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली.
त्यानंतर एडगार्डने पुन्हा व्हिएतनाममधील होनोईला जाण्याची तयारी केली. मात्र पुढील चार दिवसांमध्ये भारताने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आणि २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाला.
त्यामुळे एडवर्ड भारतातच अडकून पडला. जर्मन दुतावासाने नकार दिल्याने भारताने एडवर्डला व्हिसा नाकारला आहे. मात्र यातही गोंधळात टाकणारी बाब म्हणजे सध्या ट्रान्झीट एरियामध्ये राहणाऱ्या एडवर्डने भारतीय व्हिजासाठी अर्जच केला नाहीय.
वितानतळावरील ट्रान्झीट एरियामध्ये एखाद्या प्रवाशाला एक दिवस राहता येते. मात्र एडवर्ड येथे मागील ५४ दिवसांपासून राहत आहे.
या परिसरामध्ये बाहेर पडण्यासाठी ट्रान्झीट पॅसेंजरला (जे एखाद्या तिसऱ्या देशात विमान बदलण्यासाठी उतरलेले असता) त्या देशातील व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. मात्र तो अर्ज एडवर्डने केलेला नाही.
एडवर्डसंदर्भात दिल्ली पोलीस तसेच विमातळ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही अनेकदा जर्मन दुतावासाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून दुतावासाने त्यांच्या कॉल तसेच मेसेजला कोणतेही उत्तर दिलेले नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.