भारत

Optical Illusions : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल चित्रात लपलेला हत्ती 5 सेकंदात शोधून दाखवा, लोक म्हणतील जिनियस

Published by
Ahmednagarlive24 Office

Optical Illusions : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये लपलेली गोष्टी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी दिला जातो या वेळेतच लपलेली गोष्ट शोधावी लागते.

ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच निरीक्षण कौशल्यामध्ये वाढ होते. जर तुम्हाला चित्रात लपलेली गोष्ट शोधायची असेल तर तुम्हाला शांत डोक्याने हे चित्र पाहावं लागेल.

कधी कधी काही गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात, तरीही आपण त्या पाहू शकत नाही किंवा चित्र पाहून समजून घेणे फार कठीण असते. अशी अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यातील लपलेले कोडे शोधण्यात अनेकजण तासनतास घालवतात.

हे चित्रही तसंच आहे. या चित्रात तुम्हाला जंगलात लपलेला हत्ती शोधायचा आहे. हे ऐकून तुम्हाला जरा विचित्र वाटले असेल, कारण हत्तीसारखा प्राणी शोधणे खूप सोपे आहे. पण हे चित्र पाहिल्यानंतर तुमचे डोळेही फसतील.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये हत्ती शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. या चित्रामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील मात्र हत्ती दिसणार नाही. हत्ती शोधण्यासाठी तुम्हाला चित्र बारकाईने पाहावे लागेल.

चित्रात तुम्हाला शिकारी सहज दिसत असतील. मात्र हत्ती सहज दिसणार नाही. हत्ती शोधण्यासाठी तुम्हाला शांतपणे चित्र पाहावे लागेल. तसेच बारकाईने चित्र पाहिल्यास सहज तुम्हाला हत्ती दिसून जाईल.

तुम्हाला चित्रात हत्ती सापडला नसेल तर चित्र उलटे करून पहा. तरीही हत्ती सापडला नसेल तर काळजी करू नका. तुम्ही खालील चित्रात सहज हत्ती पाहू शकता.

Ahmednagarlive24 Office