ही गोष्ट अशा मुलाची आहे ज्याचे बालपण खडतर चालू होते. वडील एका कारखान्यात कामाला होते,आणि मिळणार्या थोड्याश्या पैशांत काटकसर करत घर सांभाळत होते.
एकेदिवशी अचानक त्यांची नोकरी जाते, आणि आईला घरात पापड लाटण्याचे काम हातात घ्यावे लागते
त्यांचे वाईट दिवस सुरु असतात बर्याच दिवशी रात्रीच्या वेळी काहीच खायला नसल्याने त्यांना सर्वांना उपाशीच झोपावं लागायचं.
पण ह्या सर्व परीस्थितीतही तो तरुण धैर्य गमावत नाही आणि अवघी वयाच्या 22 व्या वर्षी आयपीएस बनून आईवडीलांच्या कष्टाची परतफेड करतो.
साफिन त्याच्या या प्रवासाबद्दल बोलताना सांगतो ”आई – वडीलांचा” संघर्ष डोळ्यासमोर होता,मला नेहमी वाटायचं की त्याच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.
वयाच्या 22 व्या वर्षी पोलिस अधीक्षक !
वयाच्या 22 व्या वर्षी सफिनने आयपीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला,आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती गुजरातमधील जामनगर येथे झाली. तेथे त्यांनी 23 डिसेंबरलाच पदभार स्वीकारला.
सफिनच्या सांगतो ”गावात एकदा पोलीस अधिकार्याची भेट झाली. तो बॉडी गार्डसमवेत फिरत होता.मी त्याला भेटल्यानंतर त्यांनी मला ते इथपर्यंत कसे पोहोचले ते सांगितले,यानंतर सफिनच्या आयुष्याचा हेतूचं आयपीएस अधिकारी होण्याचा होता.