Health Tips : बॅड कोलेस्ट्रॉल तुमच्यासाठी धोक्याची घंटा! कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा या तीन घरगुती गोष्टींचे सेवन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना तरुण वयात गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत. याला कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे.

शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर बाब आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे अन्यथा हे वाढते कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. दिवसेंदिवस अनेकांचा लठ्ठपणा वाढत चालला आहे. त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मुख्यतः कोलेस्टेरॉलचे २ प्रकार असतात. बॅडकोलेस्टेरॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल हे प्रामुख्याने दोन प्रकार शरीरामध्ये आढळतात. जेव्हा बॅडकोलेस्ट्रॉल शरीरात वाढते तेव्हा उच्च रक्तदाबाची शक्यता अधिक असते. तसेच स्‍ट्रोक, मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांचा धोकाही वाढतो.

त्यामुळे अशा वाढत्या बॅडकोलेस्ट्रॉलवर वेळीच नियंत्रण ठेवले पाहिजे अन्यथा तुमच्या शरीरास हे कोलेस्टेरॉल हानी देखील पोहचवू शकते. त्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील यावर नियंत्रण मिळवू शकता.

धन्याचा वापर

कोथिंबिरीचा वापर भारतातील जवळपास सर्वच घरामध्ये केला जातो. भाज्या आणि इतर पदार्थांची चव कोथिंबिरीमुळे वाढते. तसेच मसाला बनावट असताना देखील धन्याचा वापर केला जातो. धने आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक त्यात आढळतात.

धने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला बाहेर काढते. जर तुमच्या शरीरात बॅडकोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात वाढले असेल तर तुम्ही जेवणात किंवा खाण्याच्या पदार्थात धन्याचा वापर करू शकता. यासाठी दररोज एक चमचा धने किंवा धने पावडर दोन मिनिटे पाण्यात उकळून प्यावे.

मेथीचे दाणे खराब कोलेस्ट्रॉल दूर करतात

अनेकांच्या घरामध्ये मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते. पण मेथीच्या धान्यांमध्ये बॅडकोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर काढण्याची खूप शक्ती आहे. दररोज याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथी दाण्यांचा चहाही पिऊ शकता. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या तर दूर होतेच पण डायबिटीजही बरा होतो.

आवळा खराब कोलेस्ट्रॉल दूर करतो

अवलयामद्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे शरीरातील अनेक आजार दूर करण्यास आवळ्याची मदत होते. बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर आवळ्याचे सेवनाने ती कमी होऊ शकते. त्यामुळे वाळ्याचे सेवन दररोज केले पाहिजे. आवळ्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात.