Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Healthy Relationships Tips : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी सारखेच होतात वाद ? फॉलो करा ह्या 13 Psychological Tips होईल मोठा फायदा

Healthy Relationships Tips : आजकाल प्रत्येकाच्या नात्यामध्ये रुसवा आणि फुगवा हा असतो. नाते कोणतेही त्यामध्ये मतभेद हे होताच राहतात. त्यामुळे अनेकदा वाद टाळण्याचे प्रयत्न करा. तसेच नात्यातील मतभेद कशामुळे होता आहेत हे जाणून घ्या आणि त्या गोष्टी न करण्याचा प्रयत्न करा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अनेकदा तुम्हाला इतरांसोबत गप्पा मारताना किंवा डिबेटिंग करताना तुमच्याकडे चांगले स्किल असेल तर तुम्ही सहजपणे इतरांसमोर तुमचे मत मांडू शकता. पण जर तुम्हाला अनेकदा तुमचे मत गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी मांडताना तुम्ही अयशस्वी होत असाल तर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्याने तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

1. स्वतः शांत राहा

जर तुमचा इतरांसोबत वाद झाला तर तर तुम्ही तुमचे मत मांडताना ठाम राहा. तसेच तुमचे मत मांडत असताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. जर तुम्हाला युक्तिवाद जिंकायचा असेल तर स्वतःला शांत ठेवा. संयम ठेवल्याने तुम्ही सहज युक्तिवाद जिंकू शकता.

2. सकारात्मक शब्द वापरा

वादाच्या वेळी अनेकदा व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण विसरून जातो आणि काहीही बोलू लागतो. पण तेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेऊन सकारात्मक बोलले पाहिजे. तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडण्यासाठी तुम्ही सकारात्मक शब्द वापरा.

3. विराम देऊन बोला

तुमच्या मैत्रिणींमध्ये आणि तुमच्यात जर वाद झाला तर तुमचा मुद्दा इतरांना समजावून सांगणे फार कठीण असते. या वेळी थोडी शांतात ठेवणे गरजेचे आहे. तसेच यावेळी सतत न बोलता थोडा आर्म घेऊन शांत पद्धतीने जर संभाषण झाले तर नक्कीच तुमच्यामधील वाद मिटू शकतो. तसेच जास्त वेळ शांत देखील बसू नका असे केल्याने समोरचा व्यक्ती गोंधळून जाईल.

4. मनमोकळे व्हा

वादाच्या वेळी अनेकदा लोक बचावाची भूमिका स्वीकारत असतात. जर तुम्ही असे केले तर तुम्ही हरला म्हणून समजा. कारण बचावाची भूमिका घेणे म्हणजे एकप्रकारचे हरणे आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही मनमोकळे पणाने बोला.

5. समोरच्या व्यक्तीला प्रतिक्रिया देण्यास भाग पाडा

जर वादाच्या वेळी समोरचा व्यक्ती शांत बसत असेल किंवा कोणतीही प्रतिक्रिया देत नसेल तर तुम्ही स्वतःला कोणताही आणि कसलाही फरक पडत नाही असे दाखवा. असे केल्याने समोरचा व्यक्ती प्रतिक्रिया देण्यास भाग पडेल.

6. प्रथम एक उपाय ऑफर करा

तुमच्यात आणि इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये वाद झाला तर तुम्ही त्यामधील एक उपाय शोधा. तसेच तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. दोघांमधील वादात एक माध्यम तोडगा काढा. असे केल्यास वादावर तोडगा निघू शकतो.

7. सॉक्रेटिक पद्धत

ही एक सोपी पद्धत आहे. जर तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला भेटण्यासाठी जात आहात आणि 4 तास उशिरा झाला आहे समोरच्या व्यक्तीला राग येणे साहजिकच आहे. त्यामुळे अशावेळी तुम्ही असे प्रश्न विचारले पाहिजेत- ‘मला उशीर झाला, तुला कसे वाटते?’ ‘माझ्या जागी तू असतास तर काय करशील?’ किंवा ‘तुम्हाला आता काय करायचे आहे?’

8. एक खात्रीशीर गोष्ट सांगा

जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा विश्वास जिंकायचा असेल तर तुम्ही एक प्रेरित कथा सांगा. अनेकदा कथा ऐकून समोरच्या व्यक्तीला विश्वास बसू शकतो. त्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्या मताशी सहमत होईल.

9. स्पष्टता महत्वाची आहे

वैयक्तिक वादविवादासाठी ही एक फायदेशीर युक्ती आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वकाही स्पष्टपणे सांगावे आणि त्याच वेळी त्यांचे लक्षपूर्वक ऐकावे. चक्कर मारून बोलू नका, यामुळे समोरची व्यक्ती गोंधळून जाईल आणि मतभेद बराच काळ टिकून राहतील.

10. चेहऱ्यावरील हावभावांची काळजी घ्या

वादविवादाच्या वेळी तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली यात फरक असतो. जर तुम्ही एखाद्याकडे टक लावून पाहत असाल तर समोरच्या व्यक्तीने तुमचा स्वीकार करावाच असे नाही. बॉडी लँग्वेज एक्सपर्ट जेनिफर रिग्डन यांच्या मते, समोरची व्यक्ती उभी असल्याप्रमाणे बसण्याचा किंवा उभा राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या हातात कप, पेन, फोन किंवा तसं काहीही असू नये हे लक्षात ठेवा.

11. तुमच्या प्रतिस्पर्ध्यावर ओरडू नका

अनेकदा वाद झाल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीवर ओरडत असाल. जर तुम्ही असे केल्यास याचे रूपांतर भांडणात होऊ शकते. त्यामुळे वाद झाल्यास कधीही समोरच्या व्यक्तीवर आवाज उठवू नका.

12. एकमेकांवर दोषाचा खेळ खेळू नका

जर वाद झाला तर कधीही एकमेकांना दोष देऊ नका. समोरचा व्यक्ती जितका तितकेच तुम्ही देखील असू शकता. जर तुम्ही समोरील व्यक्तीस दोष दिला तर त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो.

13. खूप भावनिक होणे टाळा

वादविवादाच्या वेळी अनेक प्रकारच्या भावना जाणवतात. राग येतो, दुःखी होतो आणि कधी कधी रडतो. आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. तुम्हाला राग येत असेल तर ब्रेक घ्या, थोडा वेळ शांत बसा.