Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Heart Attack : हृदयविकाराच्या झटक्यावेळी जिभेखाली ठेवा हे औषध, वाचू शकतो जीव; जाणून घ्या हृदयविकाराची लक्षणे

देशात दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेकडो नागरिकांचा मृत्यू होऊ लागला आहे. पण जर हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यास हे औषध तुमचा जीव वाचवू शकते.

Heart Attack : आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे कोणालाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईला वेळ नाही. तसेच बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे अनेकांना तरुण वयात गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आता दिवसेंदिवस हृदयविकाराचे झटके येणे सामान्य गोष्ट होत चालली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे शरीराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकांचा जीव वाचतो तर अनेकजणांचा जीव जातो.

पण जर तुम्ही ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे अशा व्यक्तीच्या जिभेखाली एक औषध ठेऊन तुम्ही त्याचा जीव वाचवू शकता. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर २४ तास अगोदर लक्षणे दाखवत असते.

जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेकांना त्याची लक्षणे ओळखू आली तर अनेकांचा जीव वाचू शकतो. चला तर जाणून घेऊया हे औषध कोणते आहे आणि त्याचा वापर कसा करायचा?

हृदयविकाराची लक्षणे

अत्यंत अशक्तपणा किंवा थकवा
छातीत जडपणा किंवा वेदना जाणवणे
झोपेचा त्रास
हृदय धडधडणे
हातामध्ये अशक्तपणा / जडपणा
विचार किंवा स्मृती मध्ये बदल
दृष्टी बदल
ढेकर देणे
अस्वस्थता आणि श्वास घेण्यात अडचण
मळमळ वाटणे

हृदयविकाराच्या सुरुवातीची लक्षणे

एका संशोधनात असे नमूद करण्यात आले आहे की, 34 टक्के महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी मळमळ होते तर पुरुषांना कमी प्रमाणात लक्षणे जाणवतात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांच्या जबडा, मान, पाठ, हात किंवा खांद्यावर वेदना सुरू होतात. यासोबतच हात-पायांमध्ये सतत मुंग्या जाणवतात.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर हे औषध जिभेखाली ठेवा

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकांचा मृत्यू होतो. पण जर शरीरात लक्षणे जाणवल्यास काही पर्याय तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकतात. तुमच्याकडे डिस्प्रिन, इकोस्प्रिन किंवा ऍस्पिरिन असेल तर तुम्ही ते रुग्णाला द्या.

जर तुम्हाला 5mg ची सॉर्बिट्रेटची गोळी मिळाली तर ती ताबडतोब जिभेखाली ठेवा, त्यामुळे वेदनांची तीव्रता कमी होईल आणि नसांमध्ये रक्ताचा पुरवठा वाढेल. तसेच तात्काळ मदतीसाठी आणीबाणीच्या वैद्यकीय हेल्प लाइन नंबरवर कॉल करा आणि पीडिताला झोपून ठेवा.