Categories: भारत

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- प्रयागराज येथील युसूफपूर गावातील एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्येनं आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे.

एकाच कुटुंबातील पाचजणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुले कान्हा (6) आणि कुंज (3) हे होते. शनिवारी रिक्षाचालक असलेला सोनू घरी आला.

सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची खळगी भरतो. नेहमी सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र, रविवारी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी मुन्नी देवी या तिवारी यांच्या घरी गेल्या. त्या महिलेने दरवाजा उघडताच तिच्यासमोर पाच मृतदेह पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक दृश्य पाहताच तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. 

विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. तर पत्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुलं कान्हा (6) और कुंज (3) हे होते. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्यामुळे तो सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र त्या दिवशी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी विजयशंकर तिवारी यांची वहिनी तिवारी यांच्या घरी गेली.

मात्र त्या महिलेला समोर थेट 5 मृतदेहच पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक घटना बघून ती महिला जोरात ओरडली.पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले मात्र मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24