अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने 1,999 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड योजनेत मोठा बदल केला आहे. हा बदल ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. कंपनीने आपल्या 1999 च्या योजनेत एक विशेष बदल केला आहे.
या योजनेचा मूलभूत लाभ बदललेला नाही, परंतु ओटीटी सब्सक्रिप्शन बेनेफिटमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. बीएसएनएलच्या 1999 प्रीपेड योजनेत आता Lokdhun आणि Eros Now यांचं युजर्सना फ्री सबस्क्रिप्शन दिलं जात आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये Lokdhun चं एका वर्षासाठी आणि Eros Now चं 60 दिवांसाठी सबस्क्रिप्शन मिळायचं.
पण आता नव्या अपडेटनंतर Lokdhun चं 60 दिवसांसाठी आणि Eros Now चं सबस्किप्शन 365 दिवसांसाठी भेटेल. इतर फायदे जाणून घेऊयात –
1999 च्या प्लानचे हे उर्वरित फायदे :- बीएसएनएलच्या 1999 च्या योजनेत ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दिवसाला 100 एसएमएस मिळतात. या योजनेची वैधता 365 दिवस आहे. चांगली गोष्ट म्हणजे कंपनीची 1,999 रुपयांची प्रीपेड रिचार्ज योजना सर्व सर्कल मध्ये उपलब्ध आहे.
लोकधुन व इरोज नाउ सब्सक्रिप्शन :- बीएसएनएल काही प्रीपेड योजनांमध्ये लोकधुन आणि इरोस नाउचे सब्सक्रिप्शन देते आणि यामध्ये 1,999 रुपयांचा प्लॅनदेखील समाविष्ट आहे. बेसिक बेनिफिटसह बीएसएनएल या योजनेनुसार मुंबई आणि दिल्लीसह होम सर्कल आणि नॅशनल रोमिंगमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देत आहे.
ही योजना दररोज 3 जीबी डेटासह येते. त्यानंतर आपला डेटा गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होईल. एकंदरीत या योजनेला 365 दिवसात 1095 जीबी डेटा मिळेल.
1 जानेवारीपासून बदल अंमलात आले :- 1999 च्या योजनेत इरोज नाउ सब्सक्रिप्शन बेनेफिट कालावधी वाढविण्याचा निर्णय 1 जानेवारीपासून अंमलात आला आहे. संपूर्ण वैधता कालावधीसाठी बीएसएनएल ग्राहकांना अनलिमिटेड सॉन्ग चेंज ऑप्शन सह Personalised Ringback Tone वर विनामूल्य एक्सेस मिळेल.
विनामूल्य ओटीटी सबस्क्रिप्शनशिवाय, कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्सच्या दृष्टीने ही बीएसएनएलची सर्वोत्तम योजना आहे.
जिओ, एअरटेल आणि व्हीआयशी स्पर्धा :- बीएसएनएलची 1,999 रुपयांची प्रीपेड रिचार्ज योजना सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम वार्षिक योजनांपैकी एक आहे.
खासकरुन जर त्याची तुलना खासगी टेलिकॉम कंपन्यांशी (रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्हीआय) केली गेली तर ती एक अत्यंत किफायतशीर वार्षिक योजना आहे. यापैकी कोणतीही योजना वार्षिक योजनेत दररोज 3 जीबी डेटा देत नाही.