अयोध्या येथील राम मंदिर निर्माण कार्यास सढळ हाताने मदत करा – खासदार सदाशिव लोखंडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- अयोध्या येथील राम मंदिर निर्माण कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी शिर्डी शहरात निधी संकलन अभियानाचा शुभारंभ खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे राहाता तालुक्यातील अध्यक्ष संजय शिंदे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते,

ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ गोदकर, श्री साई अरिहंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतिश गंगवाल, पोपटराव शिंदे, सचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

यावेळी खा. लोखंडे बोलत होते. ते म्हणाले, अयोध्या येथे राम मंदिर निर्माण होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्या ज्ञात अज्ञात कारसेवकांच्या बलिदानानंतर मंदिर उभारणीसाठी काम सुरू झाले आहे.

४९२ वर्षांपासून यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष झालेला आहे. अयोध्या येथे उभारण्यात येणारे हे मंदिर हे देशातील जनतेसाठी मोठी गौरवशाली आनंदाची बाब ठरत आहे. माणसाने माणसाशी कसे वागावे याची शिकवण देणारे प्रेरणास्थान ठरणार आहे.

जात पात धर्म भेद विसरून रामभक्त दारात जाऊन निधी संकलन करण्यासाठी दारात जाणार आहे. अशावेळी लोकांनी मंदिर निर्माण साठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24