भारत

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या आहेत 5 भन्नाट योजना, मिळतोय जबरदस्त परतावा; अशी करा गुंतवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Post Office Scheme : प्रत्येकजण गुंतवणूक करण्यासाठी विविध योजनांचा फायदा घेत आहे. मात्र पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक अगदी सुरक्षित आणि मजबूत परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिसच्या ५ भन्नाट योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

पोस्ट ऑफिस गुंतवणुकीवर मजबूत परतावा देत असल्याने अनेकजण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे. पोस्ट ऑफिस ५ भन्नाट योजनांबद्दल जाणून घेऊया…

सुकन्या समृद्धी योजना

पोस्ट ऑफिसने देशातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. जर या योजनेमध्ये खाते उघडल्यास बचतीवर ७.६ टक्के व्याजदर मिळते. आर्थिक वर्षात या योजनेमध्ये खात्यात जमा करता येणारी किमान रक्कम रु 250 आणि कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी

खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असताना पगारातील काही रक्कम पीएफ म्हणून कापली जाते. या रक्कमेवरही चांगले व्याजदर दिले जाते. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.

आर्थिक वर्षात तुम्ही PPF खात्यात किमान 500 रुपये ते कमाल 1.5 लाख रुपये रक्कम गुंतवणूक करू शकता. PPF ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मिळवलेले व्याज देखील करपात्र असते आणि परिपक्वतेवर मिळणारी रक्कम देखील करमुक्त असते.

मुदत ठेव योजना

या योजनेमधील खात्यावर 7 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये गुंतवणूक करून कर सवलत मिळवू शकता. यामधील गुंतवणूक प्रति आर्थिक वर्ष 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी पात्र आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

या योजनेसाठी ६० वर्षापेक्षा जास्त असलेली व्यक्ती पात्र आहे. ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती या योजनेसाठी खाते उघडू शकते. या योजनेवर 8 टक्के दराने व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कलम 80C कर लाभासाठी पात्र आहे, परंतु मिळालेले व्याज करपात्र आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

सध्या, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) 7 टक्के व्याजदर देते. NSC मध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही उच्च मर्यादा नाही आणि किमान गुंतवणूक आवश्यक आहे रु.100. एका आर्थिक वर्षात NSC मध्ये जमा केलेले 1.50 लाख रुपये कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत.

Ahmednagarlive24 Office