Hero Electric Scooter : देशात अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहेत. तसेच अजूनही अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. मात्र त्यांच्या किमती अधिक असल्याने ग्राहकांना खरेदी करणे शक्य होत नाही.
हिरो कंपनीने देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये २ स्कूटर लॉन्च केल्या आहेत. मात्र त्यांची किंमत जास्त आहे. पण आता हिरो कंपनीकडून त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी झाली
Hero MotoCorp कडून Vida V1 Plus आणि Vida V1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आल्या होत्या. मात्र आता कंपनीकडून या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. कंपनीकडून जवळपास दोन्ही स्कूटरच्या किमती २५ हजार रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.
आता Vida V1 Plus या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,02,900 रुपये झाली आहे. तर Vida V1 Pro ची किंमत 1,19,900 रुपये झाली आहे. कंपनीच्या या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे कंपनीकडून किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Vida V1 ची खासियत काय आहे?
Vida V1 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनके फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच स्कूटरचा लूकही दमदार देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅप करण्याचा देखील पर्याय देण्यात येत आहे. Vida V1 Plus मध्ये 3.44kWh बॅटरी देण्यात येत आहे तर Vida V1 Pro 3.94kWh बॅटरी पॅक देण्यात येत आहे.
रेंज आणि गती
हिरोची V1 Plus इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये जवळपास 143 किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. तर V1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 165 किमी धावू शकते. Vida V1 सिरीज मधील इलेक्ट्रिक स्कूटर 3.2 सेकंद आणि 3.4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडतात. तर या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रति तास आहे.