भारत

Best Selling Bikes : हिरोची ही बाईक Honda Activa ला देतेय टक्कर, किंमत फक्त 59 हजार रुपये…

Published by
Ahmednagarlive24 Office

Best Selling Bikes : हिरो कंपनीच्या अनेक बाईक ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. तसेच हिरो कंपनीची एका बाईकची सर्वाधिक विक्री झाली आहे. या बाईकपुढे Honda Activa देखील फिक्की पडली आहे. हिरो स्प्लेंडर ही बाईक च नाही तर हिरोच्या अनेक बाईक Activa ला मागे टाकू शकतात.

हिरो बाईकच्या किमतीही सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. आज तुम्हाला हिरोची सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक बद्दल सांगणार आहोत.

परवडणारी बाईक होंडा अ‍ॅक्टिव्हाला मागे टाकते

ग्राहकांची सर्वाधिक पसंती असलेली Hero Splendor पहिल्या स्थानावर असून डिसेंबर महिन्यात 2,25,443 युनिट्सची विक्री झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2,26,759 युनिटच्या तुलनेत हे देखील 0.58 टक्क्यांनी घसरले आहे.

तथापि, मोठी झेप घेत हिरोची एचएफ डिलक्स ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी ठरली आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.

Hero HF Deluxe ने डिसेंबर 2022 मध्ये 1,07,755 युनिट्सची विक्री केली आहे, जी डिसेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 83,000 युनिट्सच्या तुलनेत 29% ने वाढली आहे.

त्याच वेळी, गेल्या महिन्यात फक्त 96,451 Honda Activaची विक्री झाली होती आणि डिसेंबर 2021 च्या तुलनेत Activa च्या विक्रीत 7% ची घट झाली आहे. त्याचवेळी होंडा सीबी शाईन चौथ्या क्रमांकावर तर बजाज पल्सर पाचव्या स्थानावर आहे.

वैशिष्ट्ये

Hero HF Deluxe बाईक ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. त्याच्या ड्रम ब्रेक किक स्टार्ट व्हर्जनची किंमत 59,990 रुपये आहे. बाइकमध्ये 97.2 cc 4-स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट व्हर्जनमध्ये येते. यात i3S तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे 9 टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत करते.

Ahmednagarlive24 Office