भारत

Honda Amaze : स्वस्तातील होंडा अमेझ कारमध्ये देखील मिळतात होंडा सिटी कारसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये! खरेदीसाठी लोकांची गर्दी…

Honda Amaze : आजकाल भारतीय ऑटो बाजारामध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या अनेक कार धुमाकूळ घालत आहेत. पण तसेच सेडान सेगमेंटमधील कार देखील कमी नाहीत. तुम्हीही सेडान सेगमेंटमधील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

सेडान सेगमेंटमध्ये होंडा मोटर्सच्या अनेक कार भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. होंडा अमेझ कारमध्ये देखील होंडा सिटी सेडान कारसारखी जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक देखील ही कार खरेदी करण्याकडे आकर्षित होत आहेत.

एसयूव्ही सेगमेंटमधील कार जरी भारतीय मार्केट गाजवत असल्या तरी होंडा कंपनीच्या सेडान कार देखील कमी नाहीत. होंडा कंपनीच्या सेडान कारची विक्री देखील जबरदस्त होत आहे. ग्राहकांना होंडा कंपनीच्या सेडान कार चांगल्याच पसंत पडत आहेत.

होंडा अमेझ एक उत्तम सेडान

तुम्ही होंडा सिटी कार घेईचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण होंडा सिटी कारपेक्षा स्वस्त असणारी होंडा अमेझ कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकजण होंडा अमेझ कारचा पर्याय निवडत आहेत.

Honda Amaze ची वैशिष्ट्ये

ऑटो सेक्टरमध्ये, Honda Amaze ही एंट्री लेव्हल कॉम्पॅक्ट सेडान असल्याचे सांगितले जाते. त्याच वेळी, बरेच लोक याला छोटी होंडा सिटी देखील म्हणतात. Honda Amaze तीन प्रकारात येते. या कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1695 आणि व्हीलबेस 2470 मिमी आहे.

ही पाच सीट सेडान 1199cc 1.2 लीटर सिंगल पेट्रोल इंजिनसह 4 सिलेंडरसह येते. या क्षमतेवर, ही कार 90bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 18.6km मायलेज देण्याचा दावा करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.

होंडा अमेझ किंमत

Honda Amaze कारमध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED फॉग्लॅम्प्स, 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, 7-इंच टचस्क्रीन सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

या कारला 420 लीटर बूट स्पेस मिळते. Honda ने ही कार 6.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह सादर केली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.60 लाख रुपये आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts