भारत

Honda Brio 2023 : होंडाची परिपूर्ण फीचर्स असलेली शानदार कार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Honda Brio 2023 : भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता होंडा त्यांची आणखी एक जबरदस्त फीचर्स असलेली कार लॉन्च केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी नवीन कार खरेदी करण्याची संधी मिळत आहे. होंडा कंपनीकडून स्टँडर्ड ब्रिओ आणि ब्रिओ आरएस हे कारचे दोन मॉडेल लॉन्च करण्यात आली आहेत.

होंडा कंपनीकडून या दोन्ही कारच्या मॉडेलमध्ये दमदार इंजिन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी ही कार संपूर्ण फीचर्ससह सुसज्ज असलेली कार आहे. Honda Brio चे फेसलिफ्ट व्हर्जन आहे.

Honda Brio 2023 चा लुक

होंडा कंपनीकडून या कारच्या समोर एक मोठी ग्रिल देण्यात आली आहे. पूर्वी कंपनी आपल्या कारमध्ये जाड आडव्या बार देत असे, जे पातळ केले गेले आहे. त्यात एक नवीन बंपर जोडण्यात आला असून हेडलाइट्स नवीन एलईडी सिग्नेचर लाइटिंगसह आणण्यात आल्या आहेत.

कंपनीने कॉमन कलर स्कीम्स अंतर्गत क्रिस्टल ब्लॅक, इलेक्ट्रिक लाइम मेटॅलिक आणि ग्रेट मेटॅलिक कलर्समध्ये ही कार लॉन्च केली आहे. होंडा कंपनीकडून ही कार विविध रंगामध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

इंजिन कसे आहे आणि ते कोणत्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत?

Brand Honda
Model Honda Brio 2023
Engine 1.2 Liters
Cylinders 4 Cylinders
Max Power 89 bhp
Max Torque 110 Nm
Infotainment System 7 Inches
Transmission Manual and CVT

 

होंडा कंपनीकडून ही कार 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह लॉन्‍च करण्यात आली आहे. या कारचे प्रत्येक ट्रिम मॉडेल मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हे इंजिन 89 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करू शकते.

Brio RS मध्ये स्मार्टफोन इंटिग्रेशनसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. एलईडी इंडिकेटर, एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉगलाइट्स, पुश बटण स्टार्ट, रिअर व्ह्यू मिरर, रिक्वेस्ट सेन्सर, अलॉय व्हील्स इत्यादी देण्यात आले आहेत.

किंमत

होंडा कंपनीकडून परिपूर्ण फीचर्स असलेल्या कारची एक्स शोरूम किंमत 10 लाख 60 हजार रुपये ठेवली आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही याबद्दल अधिक माहिती तुमच्या जवळच्या होंडा शोरूममध्ये जाऊन घेऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts