भारत

Train Mileage : एका लिटरमध्ये रेल्वे किती किलोमीटर प्रवास करते? जाणून घ्या रेल्वेचे मायलेज

Published by
Ahmednagarlive24 Office

Train Mileage : भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. देशभरातील सर्व कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. लाखो लोक दररोज रेलवेने प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास कमी खर्चात आणि सुखदायक असल्याने भारताचे सर्वात मोठे दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते.

रेल्वे बोर्डाकडून सतत रेल्वेच्या नियमांमध्ये बदल केले जातात. तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी काही राज्यामध्ये कमी खर्चात प्रवास करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. भारतात दररोज हजारो ट्रेन धावत असतात.

पूर्वी दगडी कोळश्यावर रेल्वे धावायची मात्र त्यानंतर इंधनावर रेल्वे धावू लागली. पण प्रगत तंत्रज्ञानांमुळे आता विजेवरही रेल्वे धावू लागली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की १ किमी धावण्यासाठी किंवा १ लिटर डिझेलवर रेल्वे किती किमी धावते?

डिझेल इंजिन असणारी रेल्वे १ लिटर डिझेलमध्ये किती अंतर धावते असा प्रश्न अनेकांना पडत असेल. आवाज तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. रेल्वेचे मायलेज हे वेगवेगळ्या घटकांद्वारे काढले जाते.

ट्रेनचे मायलेज कोणत्या घटकांवर अवलंबून आहे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण त्यात एक नाही तर अनेक मानके जोडली जातात. त्यामुळे मायलेज देखील वेगवेगळे निघू शकते.

ट्रेनचे मायलेजही त्या ट्रेनमधील डब्यांच्या संख्येवर अवलंबून असते. कमी डब्यांसह, इंजिनवर कमी दाब असतो आणि त्यामुळे त्याची शक्ती वाढते. तथापि, डिझेल इंजिन गाड्यांचे मायलेज तासांच्या आधारावर मोजले जाते.

समाज ट्रेनमध्ये 12 डबे असतील तर ती पॅसेंजर ट्रेन एक किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 6 लिटर डिझेल लागते. मात्र, ट्रेनचे मायलेज तासाभराच्या आधारे मोजले जाते. म्हणजेच ट्रेन एका तासात किती प्रवास करते, त्याचे मायलेज मोजले जाते.

तसेच ट्रेनचे मायलेज तिच्या इंजिनवर देखील अवलंबून असते. इंजिनची पॉवर किती आहे तसेच ज्यामध्ये वारंवार ब्रेक लावणे, उंचीवर चढणे, कमी किंवा जास्त भार खेचणे यासारखी अनेक गोष्टीवर ट्रेनचे मायलेज अवलंबून असते.

Ahmednagarlive24 Office