Time Spent On Social Media : आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांच्याच हातामध्ये स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की स्मार्टफोनचा वापर किती वाढला आहे. सहज तुम्ही रस्त्यावरून जाताना किंवा घरामध्ये बसल्यानंतर निरीक्षण केल्यास तुम्हाला अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येईल.
प्रत्यके मोकळ्या वेळेमध्ये प्रत्येकजणाच्या हातामध्ये तुम्हाला मोबाईल दिसून येईल. जगातली नागरिकांना स्मार्टफोन वापरण्याचे एक व्यसन लागले आहे असे म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही.
आजकाल सोशल मीडियावर जगातील करोडो लोक सतत सक्रिय असतात. दिवसांतील खूप वेळे ते सोशल मीडियावर घालवत असतात. चला तर आज जाणून घेऊया कोणत्या देशातील लोक सर्वाधिक सोशल मीडियाचा वापर करतात.
लोक सोशल मीडियावर किती वेळ घालवतात
1. तुम्हाला जाणून धक्का बसेल की जपानमधील लोक सर्वात कमी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. दिवसातील फक्त 49 मिनिटे जपानमधील लोक सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
2. चीनमधील लोक सोशल मीडियावर बराच वेळ घालवत असल्याचे सर्वोक्षणातून उघड झाले आहे. चीनमधील लोक दिवसभरात सुमारे 2 तास 1 मिनिट सोशल मीडिया वेळ घालवतात.
3. अमेरिकेतील अनेक नागरिक दररोज सोशल मीडियावर सरासरी 2 तास 11 मिनिटे वेळ घालवत आहेत. त्यामुळे अमेरिकेतील नागरिक सोशल मीडियावर बराच वेळ सक्रिय असल्याचे दिसत आहे.
४. भारतातील नागरिकांनी अमेरिकेतील सोशल मीडिया वापरणाऱ्या नागरिकांनाही मागे टाकले आहे. भारतातील लोक एका दिवसात सरासरी 2 तास 44 मिनिटे सोशल मीडिया वापरण्यासाठी घालवत असतात.
5. UAE मध्ये नागरिक सोशल मीडिया वापरण्यासाठी सरासरी ऐकून 2 तास 50 मिनिटे वेळ खर्च करतात.
6. इंडोनेशियामध्ये नागरिक दररोज सरासरी 3 तास 7 मिनिटे सोशल मीडियाचा वापर करत आहेत.
7. फिलिपिनोमधील लोक दररोज सरासरी 3 तास 42 मिनिटे सोशल मीडियावर घालवतात.
8. दक्षिण आफ्रिकेत 3 तास 44 मिनिटे सोशल मीडियाचा वापर केला जातो.
9. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका एकाच स्थानावर आहेत. इथेही लोक सोशल मीडियावर सरासरी ३ तास ४४ मिनिटे घालवतात.
10. सोशल मीडिया वापरण्यात नायजेरिया अव्वल स्थानी आहे. येथील सामान्य लोक दिवसातील ४ तास २० मिनिटे सोशल मीडियावर घालवतात.