Bank Holidays February : जर तुमची बँकेसंबंधी या महिन्यात काही कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकून घ्यावीत. कारण या महिन्यात बँका १० दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही अडचणींशी सामना करावा लागू शकतो.
जर या महिन्यात तुम्ही काही महत्वाचे पैशांचे व्यवहार करणार असाल तर लवकर करून घ्या. अन्यथा बँकेच्या या महिन्यातील सुट्ट्या तुमच्या अडचणीच्या ठरू शकतात. त्यामुळे बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासून तुम्ही बँकेसंबंधी कामे करू शकता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अगोदरच सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात येत असते.
फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा असतो. त्यामुळे सर्वात कमी दिवस या महिन्यात असतात. पण येत्या काही दिवसांत या महिन्यात बँकांना एकामागून एक सुट्ट्या येणार आहेत. त्यामुळे बँकेसंबंधी सर्व कामे त्वरित उरकून घ्या.
आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये 10 दिवसांची सुट्टी असणार आहे, म्हणजे बँका 10 दिवस बंद राहणार आहेत, एवढेच नाही तर बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. या संदर्भात आरबीआयने एक आवश्यक यादी देखील जारी केली आहे, जी तुम्ही तपासू शकता.
या दिवशी बँका बंद राहतील
15 फेब्रुवारी 2023 – इंफाळ बँका Lui-Ngai-Ni मुळे बंद राहतील.
18 फेब्रुवारी 2023 – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम येथे महाशिवरात्रीमुळे बँका बंद राहतील.
19 फेब्रुवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहतील.
20 फेब्रुवारी 2023 – आयझॉलमध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहतील.
21 फेब्रुवारी 2023 – लोसारमुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहतील.
25 फेब्रुवारी 2023 – चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
26 फेब्रुवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहतील.
येथे जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका बंद राहतील
तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची माहिती ऑनलाइन पाहायची असेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लिंकवर जाऊनही माहिती मिळवू शकता.