Categories: भारत

दुचाकी – चारचाकीच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

इंदापूर दुचाकीस चारचाकीने पाठीमागून धडक दिल्यामुळे पती-पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात पूणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती गागरगाव (ता. इंदापूर) येथे घडला.

सुवर्णा दुपारगुडे, दयानंद दुपारगुडे अशी मृतांची नावे आहेत. वैभव दुपारगुडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादी व त्यांचे चुलते व चुलती, नात हे दुचाकीवर (क्रमांक एम एच 12 केएफ 5535) पुण्यावरून सकाळी सात वाजता आपल्या मूळगावी निलेगाव येथे निघाले होते.

ते महामार्गावर लोंढेवस्ती गागरगाव ( ता. इंदापूर ) येथे रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबले असताना, त्याचवेळी पुणे बाजुकडून भरधाव आलेल्या चारचाकीने (क्रमांक एम एच 04 एचएम1528 ) त्यांना जोराची धडक दिली.

यामध्ये सुवर्णा दुपारगुडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती दयानंद दुपारगुडे यांना दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला.

अहमदनगर लाईव्ह 24