अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नीने कायमचा बंदोबस्त केला आहे. माहेरच्या माणसांसोबत मिळून पत्नीने अतिशय निर्घृणपणे पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे.
पत्नीच्या नातेवाईकांनी आधी पतीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकून त्याच्यावर चाकूनं वार केले.या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मृत व्यक्ती सलेमपूरची रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्याची माहिती पतीला मिळाली. त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं.
यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यानंतर या पत्नीने आपल्या आई वडिलांच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. आरोपींनी त्याच्या डोळ्यात, कानात, नाकात फेविक्विक टाकलं. यानंतर त्यांनी त्याच्या शरीरावर चाकूनं वार केले.
यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह एका गोणीत भरला. मृतदेह जाळण्यासाठी आरोपी घराबाहेर पडले. ते पेट्रोल खरेदी करण्यासाठी निघाले असताना पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
पोलिसांना पाहताच आरोपी दुचाकी आणि मृतदेह टाकून पळू लागले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून आरोपींना अवघ्या काही तासांतच जेरबंद केले. यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.