Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Hyundai Creta EV : लोकप्रिय कार Hyundai Creta लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक रूपात, सिंगल चार्जमध्ये धावणार 300 किमी

Hyundai Creta EV : भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai कंपनीच्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. त्यातीलच एक आलिशान कार Hyundai Creta देखील सर्वाधिक लोकप्रिय आहे. आता हीच Hyundai Creta कार इलेक्ट्रिक रूपात पुन्हा लॉन्च होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय ऑटो मार्केटमध्ये Hyundai Motors देखील आता त्यांची लोकप्रिय कार Hyundai Creta इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च करणार आहे. अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच कंपनीकडून याबाबत खुलासा केला जाऊ शकतो.

Hyundai मोटर्सकडून इलेक्ट्रिक क्रेटामध्ये जबरदस्त लूक दिला जाऊ शकतो. तसेच या कारमध्ये सर्वोत्तम फीचर्स दिले जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना आता परिपूर्ण फीचर्स असलेली इलेक्ट्रिक कार लवकरच खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो. Hyundai Creta EV कार MG ZS EV कारसोबत स्पर्धा करेल.

ह्युंदाई क्रेटा ईव्ही पॉवरट्रेन

ह्युंदाई क्रेटा ईव्ही कारमध्ये 327 व्होल्ट आर्किटेक्चर, 39.2 kWh बॅटरीसह 134 bhp पॉवर आणि 395 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यामध्ये 300 किमी पेक्षा जास्त रेंज मिळेल असा दावा करण्यात येत आहे.

Hyundai Creta EV वैशिष्ट्ये

कंपनी या कारमध्ये सर्वोत्तम फीचर्सही देऊ शकते. यात पॅनोरामिक सनरूफ, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 6 एअरबॅग्ज, ADAS यांसारखी छान वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

Hyundai Creta EV किंमत

कंपनीने सध्या या कारच्या किमती जाहीर केल्या नाहीत. पण असे मानले जात आहे की कंपनी या कारला सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत सुमारे 20 ते 22 लाख रुपये बाजारात लॉन्च करू शकते. म्हणूनच जर तुम्ही आलिशान कार घेण्याचा विचार करत असाल, तर Hyundai ची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.