भारत

Hyundai Verna 2023 : ह्युंदाईची जबरदस्त Verna कार नवीन अवतारात करणार कमबॅक, बुकिंग सुरु…

Published by
Ahmednagarlive24 Office

Hyundai Verna 2023 : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्युंदाई कार कंपनीने देखील मारुती सुझुकीनंतर चांगला जम बसवला आहे. तसेच या कंपनीच्या कारला ग्राहकही चांगला प्रतिसाद देत आहेत. कंपनीकडून देखील ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेलच्या कार बाजारात दाखल केल्या जात आहेत.

ह्युंदाई कंपनीकडून लवकरच लोकप्रिय कारचे नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले जाणार आहे. Verna कार नवीन बदलांसह बाजारात लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फिचर आणि दमदार मायलेज देण्यात येणार आहे. स्टायलिश लूकसह ही कार बाजारात लॉन्च होणार आहे.

Hyundai Verna 2023 इंजिन

ह्युंदाई कंपनीकडून २०२३ मधील Verna चे नवीन मॉडेल 4 इंजिन पर्यायांसह लॉन्च करण्यात येणार आहे. एक नवीन 1.5-लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन देखील असेल, जे सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच 7-स्पीड डीसीटीशी जोडले जाईल. याशिवाय कारमध्ये 1.5 लीटर MPi पेट्रोल इंजिन देखील देण्यात येणार आहे.

वैशिष्ट्ये

Hyundai Verna कारमध्ये जुन्या कारपेक्षा अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. ड्युअल टचस्क्रीन, ADAS तंत्रज्ञान, नवीन सभोवतालची प्रकाश व्यवस्था, पॅनोरॅमिक सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंग अशी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.

किंमत आणि बुकिंग

कंपनीकडून लवकरच नवीन Hyundai Verna कार लॉन्च केली जाणार आहे. या कारची बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. या कारची बाजारात किंमत 15 ते 18 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम असू शकते.

Ahmednagarlive24 Office