अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- चेन्नई सुपरकिंग्जची टीम आयपीएलच्या इतिहासात पहिल्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकली नाही. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर विश्वास कायम ठेवला.
संघाचे सीईओ काशी विश्वनाथनने म्हटले की, तो २०२१ मध्ये देखील संघाने नेतृत्व करेल, असा विश्वास आहे. त्याने आमच्यासाठी तीन किताब जिंकून दिले. पहिल्यांदा आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही.
इतर कोणतही टीम असे करू शकली नाही. एक वर्ष खराब गेल्याने सर्व काही बदलण्याची गरज नाही. त्यांनी म्हटले, ‘यंदा आम्ही आपल्या क्षमतेनुसार प्रदर्शन केले नाही. जे सामने जिंकायला हवे होते, ते आम्ही गमावले. त्यामुळे आम्ही मागे पडलो.
सुरेश रैना, हरभजन सिंग नसल्याने आणि कोरोनामुळे संघात ताळमेळ राहिला नाही.’ धोनी २०२१ मध्ये संघाचे नेतृत्व करेल, मात्र पुढील सत्रात संघ पूर्णपणे नव्या स्वरूपाचा असेल.
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने नुकतेच म्हटले होते, संघ विखुरला आहे. पुढील सत्रात मोठा लिलाव होईल की नाही, हे देखील पाहावे लागेल. मात्र, सुरेश रैना, शेन वॉटसन, हरभजन सिंग, केदार जाधव व पीयूष चावला पुढील सत्रात संघाचे सदस्य नसतील, हे निश्चित आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved