अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-लग्नाचं वचन दिल्यानंतर एखादी स्त्री दिर्घ काळापासून स्वतःच्या मर्जीने शरीर संबंध ठेवण्यास सहमत असेल तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
एका महिलेची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली असून तिने ज्यामध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिले होते.
लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्कार होतो असे नसल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालायने हा निष्कर्ष महिलेने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मांडला.
दिल्ली उच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान सांगितले की, लग्नाचे वचन देऊन शरीरसंबध ठेवण्याला बलात्कार म्हटले जाऊ शकत नाही, महिला जर दीर्घ काळापासून त्या व्यक्तीसोबत सतत शारिरीक संबंध ठेवत असेल.
या प्रकरणात निकाल सुनावताना एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रिला लग्नाचं वचन दिलं आणि त्यानंतर एका क्षणासाठी दोघांमध्ये शरीर संबंध स्थापित झाले तर अशावेळीच लग्नाच्या वचनाला शरीर संबंध ठेवण्यासाठी दिलेलं आमिष म्हणता येईल,
असं न्या. विभू बाखरू यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “काही प्रकरणांमध्ये संभोगासाठी लग्नाचं वचन दिलं जाऊ शकतं. त्यावेळी आमिष देणाऱ्याला शब्द पाळण्याची इच्छा नसते.
संभोगाला नकार देणारी स्त्री अशा प्रकारचं आमिष दिल्यावर कदाचित एका क्षण त्या आमिषाला बळी पडू शकते. मात्र, असं वारंवार घडत नाही.
” लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध ठेवणे म्हणजे कायमच बलात्कार नसतो – दिल्ली उच्च न्यायालय संभोगासाठी राजी करण्याच्या इराद्याने लग्नाचं खोटं वचन देणं महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग आहे
आणि केवळ अशीच प्रकरणं बलात्काराविषयीच्या भारतीय दंड संहितेच्या कलम 375 अंतर्गत चालवता येऊ शकतात,असंही न्यायालयाने म्हटलं.
मात्र, अशा प्रकारचे जवळचे संबंध ज्यात संभोगही आलाच आणि ते दिर्घ काळापासून असतील तर यात महिलेची मर्जी नव्हती, असं मानता येणार नाही.
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने संबंधित व्यक्तीची बलात्काराच्या आरोपातून मुक्तता केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही हा निकाल कायम ठेवला आहे.