Currency Note Latest News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून चलनातील नोटांबाबत अनेकवेळा नियम बदलले जात आहेत. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ५०० रुपयांच्या नोटांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
जर तुमच्याकडेही घरी ५०० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला आरबीआयचा नवीन नियम जाणून घेणे आवश्यक आहे. नोटबंदीनंतर आरबीआयकडून नवीन चलनातील नोटांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
अनेकवेळा एटीएममधून पैसे काढायला गेल्यानंतर तुम्हाला फाटक्या नोटा मिळतील. मात्र अशा 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या फाटक्या नोटा तुम्ही सहजपणे जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन बदलू शकता.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
जर तुमच्याकडे ५०० रुपये किंवा चलनातील इतर कुठल्याही फाटक्या नोटा असतील तर तुम्ही त्या कोणत्याही नजीकच्या बँक शाखेत जाऊन त्या नोटा बदलून घेऊ शकता. तसेच ५०० रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी RBI ने मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत.
खराब नोटा तुम्ही कशा ओळखू शकता?
जर तुमची नोट काठापासून मधोमध फाटलेली असेल तर ती अयोग्य आहे.
नोट अतिशय घाण असेल किंवा त्यात माती असेल तर ती अयोग्य समजली जाईल.
नोटा बर्याच वेळा जास्त वापरल्यामुळे खराब झाल्या तर त्या अनफिट समजल्या जातात.
याशिवाय नोटमधील ग्राफिक बदलही अयोग्य मानला जाईल.
नोटेचा रंग फिका पडला तरी ती अयोग्य मानली जाईल.
काय आहे आरबीआयचा आदेश?
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, तुमच्याकडे 500 रुपयांची जुनी किंवा फाटलेली नोट असेल, तर आता तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही शाखेत जाऊन ते बदलू शकता. जर कोणत्याही बँकेने ते बदलण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.