Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे लोकांना कोडे सोडवण्यास भाग पडत आहेत. सोशल मीडियावर अशी चित्र खूप व्हायरल होत आहेत. या चित्रामध्ये काही तरी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. तसेच यासोबतच काही वेळी दिला जातो यामध्ये हे पूर्ण करण्यास सांगितलेले असते.
ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवल्याने मन एकाग्र बनते. तसेच निरीक्षण करण्याची कौशल्ये वाढतात. मेंदूचाही व्यायाम होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण अशी चित्रे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.
चित्रातील कोडे सहजासहजी सुटणारे नसते. त्यात काहीतरी वेगळे असते. डोळ्यासमोर असणारी वस्तू शोधण्यासाठी कसरत करावी लागते. तीच अशा चित्रांची खासियत आहे.
आजच्या चित्रामध्ये तुम्हाला ४ महिलांचे चेहरे शोधायचे आहेत. पण हे चेहरे सहजासहजी तुम्हाला सापडणार नाहीत. चित्र पाहताना तुमच्या मनाची दिशाभूल होईल. पण हे चेहरे तुम्ही एकाग्र पाहिल्याने शोधू शकता.
शुप्लियाक आर्ट वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या या स्केचमध्ये तुमच्यासमोर मुख्य आव्हान असेल ते महिलांची खरी संख्या सांगणे. प्रथमच तुम्हाला एकच महिला दिसेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा चित्र पहाल तेव्हा तुम्हाला सर्वात मोठा चेहरा असलेली दुसरी स्त्री देखील लक्षात येईल. खरे आव्हान इथून सुरू होते.
चित्रात नीट पाहिल्यावर तुम्हाला एक दोन महिलांचे चेहरे दिसतील. मात्र ४ महिलांचे चेहरे शोधण्याचे आव्हान आहे. ४ महिला शोधण्यासाठी तुम्हाला बारकाईने पाहावे लागेल.
तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या महिलांबद्दल आधीच सांगितले आहे. फक्त डाव्या हाताकडे पहा आणि नंतर काळजीपूर्वक पहा. येथे हाताच्या डाव्या बाजूला दुसर्या महिलेचा चेहरा आणि हात स्वतः दिसेल.