अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-वापरलेल्या कार्स विकत घेण्याची व विकण्याची भारतातील सर्वांत विश्वसनीय मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने आपल्या ऑरेंज बूक व्हॅल्यू (ओबीव्ही) सर्वेक्षणाचे परिणाम समोर ठेवले आहेत.
यात एसयुव्ही, सेडान आणि हॅचबॅक व इतर अनेकांसह अनेक सेग्मेंटसमधील आघाडीच्या वाहनांच्या रिसेल मूल्याची माहिती दिली आहे. या नवीनतम सर्वेक्षणानुसार एमजी हेक्टरला सी- सेग्मेंट एसयुव्हीजमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे एका वर्षात ९०% इतके रिसेल मूल्य मिळाले आहे व त्यानंतर महिंद्रा एक्सक्युव्ही५००,
जीप कंपास आणि टाटा हॅरियर ह्यांचा समावेश होतो. सेडान प्रकारामध्ये आघाडीवर मारुती सुझुकी सियाझ होती व त्यानंतर होंडा सिटी, ह्युंडाई वेर्ना आणि स्कोडा रॅपिड ह्यांचा समावेश होता.
ओबीही हा वापरण्यास मोफत असलेले आंतरराष्ट्रीय उत्पादन आहे आणि एआय व डेटा सायंस वापरून सुमारे ३८ देशांमधील वापरलेल्या वाहनांची अनुमानित किंमत ते १० सेकंदांमध्ये सांगते. आत्तापर्यंत, ओबीव्हीने आपल्या माध्यमावर आलेल्या ४५ कोटींहून अधिक दर तपासण्याच्या क्वेरीजना सेवा दिलेली आहे.
ड्रूमचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अक्षय सिंह ह्यांनी म्हंटले, “ड्रूममध्ये १००० पेक्षा जास्त निकषांद्वारे आधी लोकांना आवडलेल्या कार्सचे विश्लेषण करणारी एक सक्षम वाहन मूल्यांकन प्रणाली आहे. त्यामुळे आमच्या ग्राहकांना ते खर्च करतील त्या प्रत्येक रूपयासाठी अचूक मूल्य मिळण्याची खात्री मिळते.
ओबीव्हीच्या लेटेस्ट ट्रेंडसमध्ये असे समोर आले आहे की, विविध सेग्मेंटसमधील अनेक ऑटोमोबाईल्सनी विश्वसनीयता आणि परफॉर्मंसच्या आपल्या वचनाची पूर्तता केलेली आहे. आज मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम उत्पादनांमध्ये आकर्षक रिसेल मूल्य असलेले एमजी हेक्टर आणि मारुती सुझुकी सियाझ आहे आणि ग्राहक त्यांचा विचार करू शकतात.”
ड्रूमचे ओबीव्ही हे एक इंजिनियस अल्गोरिदमिक दर दर्शवणारे इंजिन आहे ते एका वैज्ञानिक युएस पेटंटवर निर्णय करणा-या पद्धतीद्वारे वापरलेल्या वाहनाचे अचूक मूल्य दर्शवते. कार्स, बाईक्स, स्कूटर्स, सायकली व विमानांसह ५ दशलक्ष पेक्षा अधिक उत्पादनांचा समावेश ओबीव्हीद्वारे केला गेला आहे.