भारत

IMD Alert : नागरिकांनो सावध राहा ! 12 राज्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Published by
Ahmednagarlive24 Office

IMD Alert : पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील 12 राज्यांमध्ये पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. सध्या भारतातील विविध भागात कुठे थंडीची लाट तर कुठे धो धो पाऊस पहिला मिळत आहे. यातच आता देशातील 12 राज्यांना पुढील 4 दिवसांसाठी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा थंडीची लाट येऊ शकते तर आजपासून 26 जानेवारीपर्यंत तमिळनाडूसह हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश तसेच उत्तर आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार, 23 ते 26 जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. याच डोंगराळ भागात 23 ते 26 जानेवारी दरम्यान हिमवृष्टीसोबत पावसाचा जोरही वाढू शकतो.तर 24 ते 28 जानेवारी दरम्यान लडाख, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या अनेक भागात पाऊस आणि हिमवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. सोमवारपासून पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि गारपिटीसह थंडी वाढण्याची शक्यता आहे. 26 जानेवारीलाही ढग मुसळधार पाऊस पाडतील.

पुढील 24 ते 48 तासांत गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. 24 आणि 25 जानेवारीला जम्मू-काश्मीर-लडाख आणि हिमाचल प्रदेशात तर 25 आणि 26 जानेवारीला उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

IMD नुसार, 27 जानेवारीपासून वायव्य भारतावर आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे आणि अफगाणिस्तान आणि त्याच्या शेजारच्या भागावरही एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे 23 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 25 जानेवारीला आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 24 जानेवारीला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या दुर्गम भागात आणि 24 आणि 25 जानेवारीला हिमाचल प्रदेशात गारपीट होऊ शकते. दुसरीकडे, 25 जानेवारीला पश्चिम उत्तर प्रदेशातही गारपीट होऊ शकते.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

मध्य प्रदेशात 4 हवामान यंत्रणा सक्रिय आहेत, त्यामुळे 1 डझनहून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुके आणि तुषारांसाठीही हाच इशारा देण्यात आला आहे.

27 जानेवारीपर्यंत उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील डझनभर जिल्ह्यांमध्ये पावसाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे अलवर, भरतपूर, हनुमानगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये 24 ते 25 जानेवारीला पाऊस पडू शकतो.

छत्तीसगडमध्येही हलके ढग आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

23 जानेवारीला पंजाबमध्ये काही ठिकाणी तर 24 आणि 25 जानेवारीला संपूर्ण पंजाबमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान अनेक भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे.

26 जानेवारीलाही अनेक ठिकाणी पाऊस पडेल. या दिवसांत हरियाणातही पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 24 ते 26 जानेवारी दरम्यान उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्येही गारपिटीचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, बिहार आज आणि मंगळवारी ओडिशामध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 तारखेला जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी. उत्तराखंडमध्ये 25 आणि 26 जानेवारी रोजी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा.

हे पण वाचा :- Shani Asta 2023: सावधान ! ‘या’ 6 सवयींचा तिरस्कार करतो शनी ; 31 जानेवारीला अस्त होत असल्याने काळजी घ्या नाहीतर ..

Ahmednagarlive24 Office