IMD Alert : येत्या 24 तासांत धो धो कोसळणार! या 10 राज्यांना हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा…
देशातील १० राज्यांमधील हवामान पुन्हा एकदा बदलणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. काही भागात हलका तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD Alert : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. काही भागातील उष्णतेत वाढ झाली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून देशातील १० राज्यांना येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
३० मार्चपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्याने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह इतर अनेक राज्यांमध्ये IMD ने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार 30 आणि 31 मार्च रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे देशातील अनके भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
३० आणि ३१ मार्चला पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगाल आणि देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. 30 मार्चपर्यंत वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात तापमान वाढण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीममध्येही दिसून येईल.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यातील हवामान पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्हे आहेत. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील 30 आणि 31 मार्च रोजी आकाश ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.
तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
३१ मार्चपासून जम्मू-काश्मीरमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे देशभरातील राज्यांमध्ये बदल दिसून येतील. काही भागातील तापमानात घट होईल तर काही भागात उष्णतेत वाढ होणार असल्याचा अंदाज IMD वर्तवला आहे.