IMD Alert : एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. तर काही भागातील तापमानात वाढ झाली आहे. आता पुढील दिवसांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील अनेक भागात मुसळधार पावसासह गारपिटी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, आज केरळ, ओडिशा आणि माहेमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पडू शकते. तेलंगणा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात पुढील 5 दिवस पाऊस पडू शकतो.
तर मराठवाडा, कर्नाटक महाराष्ट्र, छत्तीसगड, छत्तीसगडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेश, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडूमध्येही अपेक्षित आहे. देशाच्या इतर भागात पावसाची फारशी शक्यता नाही.
या राज्यांमध्ये तापमान वाढेल
काही राज्यांमध्ये पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा तयार झाला आहे. तर काही भागातील उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. पुढील 3 ते 5 दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये आज पाऊस
स्कायमेटच्या खाजगी हवामान अंदाजानुसार एक चक्रीवादळ पश्चिम राजस्थान आणि त्याच्या शेजारच्या भागात तयार झाले आहे आणि दुसरे दुसरे चक्रीवादळ ईशान्य बांगलादेशात तयार झाले आहे.
त्यामुळे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अरुणाचल प्रदेश आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा, किनारी कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज महाराष्ट्र, छत्तीसगड, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि केरळच्या एक किंवा दोन भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे, उर्वरित देशात हवामान कोरडे राहील.
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला रब्बी पिकाचा घास हिरावून घेतला आहे. आंबा, मोसंबी गहू आणि हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.