Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

IMD Weather Forecast : भारतीय हवामान खात्याचा १० वर्षातील मान्सून अंदाज किती ठरला अचूक, जाणून घ्या आकडेवारी

भारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या मान्सून पावसाबाबत हवामान अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच गेल्या १० वर्षात हवामान खात्याचा अंदाज किती अचूक ठरला आहे ते जाणून घ्या.

IMD Weather Forecast : देशातील प्रत्येक दिवसाचे हवामान अंदाज सांगणारे भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सून बद्दल देखील अंदाज वर्तवला आहे. यंदा देशामध्ये एल-निनोची स्थिती निर्माण होऊनही यंदा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील अनेक भागात शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्व शेतकरी वर्षभरातील हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन असतात. हवामान अंदाज आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पण आजपर्यंत भारतीय हवामान खात्याचा अंदाज कितपत अचूक ठरला आहे याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? देशात अनेक खाजगी हवामान खाती आहेत ते देखील हवामान अंदाज वर्तवत असतात. आयएमडीचा १० वर्षातील हवामान अंदाज कितपत योग्य ठरला आहे ते पाहूया..

मागील १० वर्षात हवामान खात्याचा अंदाज किती खरा ठरला आहे याबद्दल इंडिया टुडे ग्रुपच्या ‘DIU’ ने हे आकडे गोळा केले आहेत जे indiaenvironmentportal.com, IMD वरून घेतले आहेत.२०१३ ते २०२३ पर्यंतची आकडेवारी यामध्ये घेण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पाऊस किती आणि किती पाऊस पडला याबद्दल माहिती घेऊया…

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार ५ वेळा अधिक पाऊस पडला आहे. म्हणजेच जर हवामान खात्याने ९८ टक्के पाऊस वर्तवला तर तो १०८ टक्के पडला आहे. म्हणजेच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार १० टक्के अधिक पाऊस पडला आहे.

२०१४ मध्ये भारतीय हवामान खात्याने ९६ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण फक्त ८६ टक्केच पाऊस पडला तर २०१५ मध्ये हवामान खात्याने ९३ टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता पण त्यावेळीही ८६ टक्केच पाऊस पडला.

तसेच हवामान खात्याने 2016 मध्ये १०६ टक्के पाऊस नोंदवला होता पण यावेळी तर आणखीही बिकट परिस्थिती होत पाऊस फक्त ९७ टक्केच पडला. त्यामुळे आकडेवारी हुकल्याचे दिसत आहे.

तसेच २०१७ मध्ये हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, तर केवळ 95 टक्के पावसाची नोंद झाली होती. २०१८ मध्ये ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता मात्र ९१ टक्केच पाऊस पडला.

पण २०१९ मध्ये आयएमडीने ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता मात्र यावेळी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा जास्त म्हणजेच ११० टक्के पाऊस कोसळला. तसेच २०२० मध्ये १० टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र १०९ टक्के पाऊस झाला.

2021 मध्ये भारतीय हवामान खात्याने ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता पण ९९ टक्के पाऊस कोसळला. 2022 मध्ये 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, तर 106 टक्के पावसाची नोंद झाली होती.

गेल्या १० वर्षांमध्ये हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ५ वेळा अधिक पाऊस पडला आहे. तसेच यावेळीच म्हणजेच २०२३ चा देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे यावेळीच भारतीय हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्यानुसार कर्नाटक, केरळ, गोवा, आंध्र प्रदेश, दक्षिण तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, पूर्व मध्य भारतातील छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड, पूर्व भारतातील बिहार या राज्यांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, आसाममध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. जम्मू काश्मीर, पंजाब आणि यूपीच्या काही भागांसारख्या उत्तर भारतातील अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.