Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

PM Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 14 व्या हप्त्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा, पहा नवीन अपडेट

पीएम किसान योजनेही १३वा हफ्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र लवकरच १४ वा हफ्ता देखील जारी केला जाणार आहे. याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे.

PM Kisan : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून आणि शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पीएम किसान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आतापर्यंत १३ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. १३ हफ्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात आलेले नाहीत.

आता शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून १४वा हफ्ता जारी करण्यात येणार आहे. त्याबाबत सरकारकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. याबाबत सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी माहिती देण्यात आली आहे.

16,000 कोटी जारी करण्यात आले

सरकारने 27 फेब्रुवारी रोजी 13 वा हप्ता जारी केला होता. या हप्त्यांतर्गत 16000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्याचा देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. तसेच आता १४वा हफ्ता देखील जरी केला जाणार आहे.

14 वा हप्ता मिळविण्यासाठी हे काम करा

जर तुमच्याही खात्यात १३व्या हफ्त्याचे पैसे आले नसतील तर तुमचे ई-केवायसी करणे बाकी आहे. ई-केवायसी केले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. त्यामुळे ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर ई-केवायसी केले नाही तर पुढील हफ्ता खात्यात वर्ग केला जाणार नसल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

असे करा ई-केवायसी

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
वेबसाइटच्या उजव्या बाजूला असलेल्या e-KYC च्या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक टाका.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.
आता तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

पीएम किसानशी संबंधित तक्रार येथे

जर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय [email protected] या ईमेल आयडीवर मेल करूनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.