स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; मोबाइल नंबर रज‍िस्‍टर्ड नसेल तर होणार ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आता सर्व मर्चेंट ट्रांजेक्शंससाठी ओटीपी अनिवार्य केले आहे. ई-मेलवर ओटीपी तात्पुरते वेळेसाठी डिसेबल केले गेले आहे.

अशा परिस्थितीत ओटीपी व एसएमएस अलर्ट मिळविण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे बँकेने आवाहन केले आहे. एसबीआय खात्याशी मोबाईल नंबर रजिस्टर करणे खूप सोपे आहे.

हे काम दोन प्रकारे केले जाऊ शकते. प्रथम – बँकेच्या शाखेत भेट देऊन, तर दुसरी – बँकेच्या अधिकृत एटीएमवर जाऊन. एसबीआय एटीएमद्वारे मोबाइल क्रमांक रजिस्टर करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

1- कार्ड स्वाइप करा. मेनूमधील ‘रजिस्ट्रेशन’ पर्याय निवडा.

2- पिन टाका.

3- मोबाइल नंबर रजिस्ट्रेशन पर्यायावर जा.

4- आता आपण रजिस्टर करू इच्छित असलेला मोबाइल नंबर भरा. आपण अचूक क्रमांक प्रविष्ट केला असेल तर ‘करेक्ट’ हा पर्याय निवडा.

5- तुम्हाला पुन्हा एकदा मोबाइल क्रमांक विचारला जाईल. ते पुन्हा भरा आणि ‘करेक्ट’ वर क्लिक करा.

6- हे केल्यावर एटीएम स्क्रीनवर तुम्हाला दिसेल- “Thank you for registering your mobile number with us.”

7- तीन दिवसात वापरकर्त्याला संपर्क केंद्राचा कॉल येईल.

8- त्यानंतर, एसएमएसद्वारे त्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरवर एक रेफरेंस नंबर पाठविला जातो.

एसबीआय कॉल सेंटरच्या मते, ग्राहकांना तीन दिवसात कॉन्टॅक्ट सेंटर वरून कॉल येतो. तथापि, कॉल सेंटरमधील व्यक्तीस सुरक्षेसाठी संदर्भ क्रमांक विचारण्यास सांगणे देखील उचित आहे.

रेफरेंस नंबर जुळल्यास कॉल सुरू ठेवा. एकदा हे काम पूर्ण झाल्यावर आपल्याला आपला वैयक्तिक तपशील वेरिफाई करावा लागेल आणि त्यानंतर आपल्या खात्यावर मोबाइल नंबर रजिस्टर केला जाईल. या संदर्भात, बँकेकडून एक कन्फर्मेशन संदेश देखील पाठविला जातो.

अहमदनगर लाईव्ह 24