उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर खासदार राहुल गांधी यांना झालेली अटक व धक्काबुक्की अत्यंत निंदनीय असून

या कृतीतून मोदी व योगी सरकार हे पूर्णपणे हुकूमशाही करत असल्याची घाणाघाती टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली असून उत्तर प्रदेशमध्ये तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानकासमोर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित निदर्शन मोर्चात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, नितीन अभंग, राजेश वाकचौरे, यासह विविध युवक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी सत्यजीत तांबे म्हणाले की, देशात मोदी व योगी सरकारच्या काळात लोकशाही पायदळी तुडवून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे.

भारतीय राज्यघटनेत सक्षम विरोधक हा लोकशाहीत अत्यंत महत्त्वाचा ठरवला आहे. मात्र विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम मोदी सरकारकडून केले जात आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते खा. राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभरात निदर्शने केली.

नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. शहरातील दिल्ली गेट परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24