Ambassador Car 1972 Price : भारतात पूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्रात ॲम्बेसेडर कारचे वर्चस्व होते. त्यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्रात म्हणावी अशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे ॲम्बेसेडर कारला अधिक महत्व होते. तसेच त्याकाळी गाडीची किंमत पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
ॲम्बेसेडर कारने 1972 साली राजकारण्यांपासून ते प्रशासनातील लोकांपर्यंत अनेकांना वेड लावले होते. तुम्ही जुन्या चित्रपटामध्ये अनेकदा ॲम्बेसेडर कार पहिली असेल. त्याकाळी ॲम्बेसेडर कारचा चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असायचा.
हिंदुस्थान मोटर्सने 1957 मध्ये ॲम्बेसेडर कार बाजारात दाखल केली होती. मारुती सुझुकी कंपनीनंतर या कारची क्रेझ कमी झाली. 2014 मध्ये कंपनीकडून ॲम्बेसेडर कारचे उत्पादन बंद करण्यात आले.
Ambassador कारची किंमत
आनंद महिंद्रा यांनी १९७२ सालीचा ॲम्बेसेडर कारचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये 50 वर्षांपूर्वीची 25 जानेवारी 1972ची बातमी दाखवण्यात. यावरून आताच्या गाड्यांची किंमत आणि त्यावेळच्या गाड्यांची किंमतीमध्ये किती तफावत आहे हे समजते.
१९७२ साली ॲम्बेसेडर कारची किंमत 127 रुपयांनी वाढून 16,946 रुपये झाली होती. ही किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र आनंद महिंद्रही ही किंमत पाहून थक्क झाले आहेत.
आनंद महिंद्रा यांचे ट्विट
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “यामुळे मी ‘संडे मेमरीज’मध्ये बुडून गेलो आहे. त्यावेळी मी जेजे कॉलेजमध्ये होतो. बसने जायचो, पण माझ्या आईने मला कधी कधी तिची निळी फियाट चालवायला दिली. तरीही माझा विश्वास बसत नाही. त्यावेळी इतका खर्च येतो.”