Categories: भारत

सुशांत प्रकरणात मुख्यमंत्री, पोलिसांची बदनामी करणारा ताब्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणे एकास चांगलेच महागात पडले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात बिनबुडाचे तर्क, आरोप समाजमाध्यमांद्वारे पसरवून संभ्रम निर्माण करणाच्या आरोपाखाली सदर तरुणास अटक केली आहे. विभोर आनंद असे या तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने ट्विटरसह फेसबुक आणि यूटय़ूबच्या माध्यमातूनही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती समोर येत आहे.

अभिनेता अरबाजला सुशांत, दिशा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली, असा दावाही त्याने यूटय़ूबद्वारे केला होता.

त्यानंतर अरबाजने विभोरविरोधात मुंबईच्या न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. सुशांत, दिशा प्रकरणात तो ट्विटर, फेसबुक आणि यूटय़ूबच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस दल,

अरबाज खानसह अन्य कलाकारांची सातत्याने बदनामी करीत होता. याबाबत सायबर पोलिसांकडे अनेक तक्रोरी प्राप्त झाल्या होत्या.

ऑगस्ट महिन्यात एका महिलेने दिलेल्या तक्रोरीवरून सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. समन्स जारी करून त्याला चौकशीसाठी हजर राहाण्याच्या सूचनाही केल्या.

मात्र चौकशीस हजर न राहाता अफवा, खोटी माहिती, बदनामीकारक साहित्य तो पसरवत होता, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24