अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- लग्न म्हंटले कि सर्वात पहिले देणे घेणे या गोष्टी पहिल्या जातात. आजही देशात अनेक ठिकाणी हुंडा प्रथा आहे, मुलीला लग्नाच्यावेळी हुंड्याच्या रूपात सोने, चांदी, पैसे आदी दिले जाते.
मात्र देशातील मध्य प्रदेशातील एक प्रथा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. मध्य प्रदेशमधील गौरेया या समाजातील मुली लग्न करून सासरी जाताना 21 विषारी साप घेऊन जातात.
माहेरून हुंडा म्हणून त्यांना हे साप दिले जातात. जर असे नाही केले तर मुलीचं लग्न मोडू शकते. ती लग्नानंतर आनंदी राहणार किंवा काही अघटित घडू शकते, असा या समाजाचा समज आहे.
परंपरेनुसार गौरेया समाजातील लोक मुलींना सासरी पाठवताना गहुआ आणि डोमी प्रजातीचे साप हुंड्यात देतात. हे साप खूप विषारी असतात. एकदा जरी हे साप चावले तर माणूस मरतोच.
महत्त्वाचं म्हणजे हे साप पकडण्याची जबाबदारी ज्या मुलीचं लग्न होणार आहे तिच्या वडिलांची असते. मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिचे वडील साप पकडण्याची तयारी करतात.
गौरेया समाजातील लोकांचं कामच साप पकडण्याचं आहे. त्यामुळे हुंड्यात मिळणारे साप त्यांच्या उपजीविकेचं एकप्रकारे साधनच आहे. सापांचा खेळ दाखवून किंवा त्याचं विष विकून हे लोक पैसे कमवतात.