Interesting Facts India : भारतात ‘ह्या’ ठिकाणी १८ ऑगस्टला साजरा होतो ‘स्वातंत्र्य दिन’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Interesting Facts India : दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील १५ ऑगस्ट रोजी तमाम भारतीयांनी अत्यंत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण रंजक गोष्ट अशी की भारताचाच एक भाग असूनही पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी नव्हे तर १८ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

हे ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे पूर्णपणे सत्य आहे. त्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे.

ते कारण म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी पश्चिम बंगाल राज्यातील नदिया आणि मालदा जिल्हे अधिकृतपणे स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. हे दोन जिल्हे १८ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात सामील करण्यात आले.

१२ ऑगस्ट १९४७ रोजी व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी घोषणा केली की, भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिले जाईल. दरम्यान, तोपर्यंत बंगाल एक वादग्रस्त विषय बनला होता. यामागे ब्रिटिश अधिकारी सिरिल रेडक्लिफ यांची एक मोठी चूक होती.

त्यांनी पहिल्यांदा चुकीचा नकाशा बनवला होता. त्यांनी विभाजनानंतर हिंदूबहुल जिल्हे मालदा आणि नदिया पूर्व पाकिस्तान ( बांगलादेश ) ला दिले होते. काही दिवसांनंतर माऊंटबॅटन यांनी तत्काळ बंगाल विभाजनाचा आदेश पुन्हा लागू केला.

त्यानंतर हिंदू बहुसंख्य असणारे जिल्हे भारताला तर मुस्लिमबहुल जिल्हे पूर्व पाकिस्तानला सोपवले गेले. ही प्रक्रिया १७ ऑगस्टच्या रात्री पूर्ण करण्यात आली. त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवरील अनेक गावांत १५ ऑगस्टऐवजी १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.