India Billionaires List: भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ! 187 नवीन अब्जाधीश, महाराष्ट्रातून तब्बल इतके अब्जाधीश…

Ahmednagarlive24 office
Published:
Richest billionaires in India

India Billionaires List : जगभरात अब्जाधीशांची संख्या काही कमी नाही. दिवसेंदिवस कोण ना कोण तरी नवीन अब्जाधीश बनतच आहे. तसेच जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारतातील उद्योगपतींचा देखील नंबर लागतो. आता भारतात तब्बल एक दोन नाही तर तब्बल १८७ नवीन अब्जाधीश बनले आहेत.

2023 ची M3M Hurun ग्लोबल रिच लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १८७ नवीन अब्जाधीशांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व नवीन अब्जाधीश वेगवेगळ्या शहरामधून आहेत. यामध्ये देशातील २५ टॉप शहरांचा समावेश आहे.

M3M Hurun ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबई, नवी दिल्ली आणि बेंगळुरू ही जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची निर्मिती करणाऱ्या टॉप 25 शहरांमध्ये समावेश आहे. डेटा दर्शविते की गेल्या एका वर्षात 24 भारतीय शहरे आणि शहरांमध्ये 187 अब्जाधीशांचा जन्म झाला, त्यापैकी 66 अब्जाधीश एकट्या मुंबईतून आले आहेत.

देशातील मुंबई शहरातून या वर्षी सर्वाधिक अब्जाधीश झाले आहेत. तर त्यानंतर नवी दिल्लीचा नंबर लागतो. नवीन दिल्लीमधून 39 अब्जाधीश झाले आहेत. तर बेंगळुरूमधून 21 अब्जाधीश आले आहेत. तीन मेट्रो शहरांमध्ये नवीन भारतीय अब्जाधीशांचा वाटा ६७ टक्के आहे.

सर्वाधिक अब्जाधीश कुठे झाले?

जगातील सर्वाधिक अब्जाधीश हे अमेरिकेमध्ये आहेत. अमेरिकेमध्ये एका वर्षात ६९१ अब्जाधीश झाले आहेत. हे अब्जाधीश 236 शहरे आणि गावांतील आहेत. अब्जाधीशांच्या अव्वल स्थानावर अमेरिका कायम आहे.

चीननमध्ये याच कालावधीत १२८ अब्जाधीशांची निर्मिती झाली आहे, ज्यामध्ये ११० अब्जाधीश एकट्या बीजिंगमधील आहेत. त्यानंतर जर्मनी (67 अब्जाधीश) आणि स्वित्झर्लंड (37 अब्जाधीश) यांचा क्रमांक लागतो. यूके, इटली, कॅनडा, फ्रान्स आणि ब्राझील यांनी अनुक्रमे 36, 22, 18, 16 आणि 12 अब्जाधीशांची निर्मिती केली.

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2023 ने 2,356 कंपन्या आणि 69 देशांमधील काही डेटा जारी केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 3,384 अब्जाधीश होते, जे आता 3,112 अब्जाधीशांवर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अब्जाधीशांच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली असून त्यांची एकूण संपत्ती 10 टक्क्यांनी घसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe