इस्रोने आपल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल घोषणा केली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दोन उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग करण्यात आले. एक वस्तू म्हणून दोन्ही उपग्रहांचर नियंत्रण प्रस्थापित करण्याची प्रक्रिया देखील यशस्वी ठरलो.
पुढील काही दिवसांत पॉवर ट्रान्सफर म्हणजे एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात विद्युत प्रवाह पाठवण्याची चाचणी घेतली जाईल. डॉकिंगसंदर्भातील सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अनडॉकिंग अर्थात उपग्रह विभक्त करण्यात येतील. यानंतर दोन्ही उपग्रह त्यांच्यावरील पेलोडद्वारे निर्धारित जबाबदाऱ्या पार पाडतील. (बॉक्स) ऐतिहासिक यशाबद्दल इस्रोचे कौतुक
केल्याचद्दल इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना भारताच्या आगामी महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या यशाबद्दल इस्रोचे अभिनंदन केले.
स्पेडेक्स मोहिमेचे महत्त्व
आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका, चीन या देशांकडेच अंतराळातील डॉकिंगचे तंत्रज्ञान होते. या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे, भारताने संपूर्णपणे स्वबळावर स्वदेशी डॉकिंग तंत्रज्ञान विकसित करून त्याची यशस्वी चाचणी घेतली आहे. अंतराळवीरांना एका बानातून दुसऱ्या यानात पाठवण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. भविष्यात भारताला
चांद्रयान-४ मोहिमेद्वारे चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणायचे आहेत, चंद्रावर मानवाला पाठवायचे आहे. याशिवाय, स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण करायचे आहे. या मोहिमांच्या यशस्वीतेसाठी डॉकिंग तंत्रज्ञान ही अतिशय प्राथमिक व मूलभूत गरज आहे.
तिसऱ्या प्रक्षेपण स्थळाला मंजुरी
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी तिसरे लॉचिंग पेंड उभारण्यास कॅबिनेटने मंजुरी दिली. या प्रक्षेपण स्थळाच्या उभारणीसाठी ३,९८५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रक्षेपण स्थळामुळे पुढील पिढीच्या यानांचे प्रक्षेपण करण्यास मदत होईल. हे तिसरे प्रक्षेपण स्थळ चार वर्षांच्या आत तयार करण्याचे लक्ष्य आहे. विद्यमान लॉचिंग पेंड ८ हजार टन वजनी अंतराळ यानाच्या प्रक्षेपणास सक्षम आहे. नव्या लॉचिंग पैडवरून ३० हजार टन वजनी अंतराळ यानाचे प्रक्षेपण करता येईल.