India Famous Brand Shoes : भारतात अनेक कंपन्यांचे शूज तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील. तसेच तुम्ही देखील अनेकदा वेगवेगळ्या कंपन्यांचे शूज खरेदी केले असतील. कधी लोकल तर कधी ब्रँडेड शूज तुम्ही देखील वापरले असतील. पण भारतात असे ५ ब्रँडेड शूज आहेत ते सर्वाधिक फेमस आहेत.
भारतातील ५ प्रसिद्ध शूज जे सेलिब्रिटींपासून ते सामान्यपर्यंत फेमस आहेत. अनेकांचा ब्रँडेड शूज खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. तसेच अंकेजन ब्रह्नदेश शूजचे कलेक्शन देखील करत असतात. आज तुम्हाला भारतातील ५ फेमस शूज बद्दल सांगणार आहोत.
भारतातील फेमस 5 सर्वोत्तम शूज
1. बाटा
भारतातील प्रसिद्ध शूजपैकी बाटा हे एक आहे. 1894 मध्ये टॉमस बाटा यांनी याची सुरुवात केली आहे. आता बाटा कंपनींचे ७० देशांमध्ये 5,000 पेक्षा जास्त शोरूम्स आहेत. बाटा कंपनीने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे शूज, चप्पल्स आणि फॅशनेबल फुटवेअरचे उत्पादने सादर केली आहेत. महिला आणि पुरुषांसाठी बाटा कंपनीने बेल्ट, पर्स आणि विविध उपकरणे तयार केली आहेत.
2 Nike
तरुणांमध्ये Nike कंपनीची अनेक उत्पादने फेमस आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजणच Nike चे ब्रँडेड शूज आणि चप्पल्स खरेदी करण्याकडे आकर्षित होत असतात. 1964 मध्ये फिल नाइट आणि बिल बोवरमन यांनी याची स्थापना केली आहे.
देशातील अनेक स्पर्धांमधील खेळाडूंकडे Nike चे शूज पाहायला मिळतात. Nike चे देशभरात 1,000 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. या कंपनीचे शूजची दर्जेदार आणि दमदार लूक म्हणून ओळख आहे.
3. Adidas
Adidas या कंपनीचे शूज देखील तरुणांना भुरळ पाडतात. Adidas ही एक जर्मनीमधील कंपनी आहे. 1924मध्ये अॅडॉल्फ डॅस्लरने या कंपनीची स्थापना केलीय आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकांची मोठी स्पोर्ट्सवेअर कंपनी आहे.
4. Reebok
रिबॉक ही कपडे आणि पादत्राणे बनवणारी अमेरिकन कंपनी आहे. त्याची स्थापना 1895 मध्ये झाली. जर्मन व्यवसाय Adidas च्या उपकंपनीचे मुख्यालय कॅंटन, मॅसॅच्युसेट्स येथे आहे. पुरुष, महिला आणि मुलांसाठी कंपनीकडून विविध प्रकारची उत्पादने बनवली जातात. भारतीय बाजारपेठेमध्ये देखील रिबॉक ची उत्पादने अधिक विकली जात आहेत.
5. Puma
Puma ही एक जर्मन बहुराष्ट्रीय पादत्राणे आणि कपडे निर्मिती कंपनी आहे. 1948 मध्ये रुडॉल्फ डॅस्लरने Puma कंपनीची निर्मिती केली आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी स्पोर्ट्सवेअर उत्पादक कंपनी आहे. तरुणांमध्ये या कंपनीचे शूज देखील खूपच फेमस आहेत.