नवी दिल्ली :- लोकांचे उत्पन्न तसेच खरेदीची क्षमता घटली असून औद्योगिक उत्पादन, प्रत्यक्ष कर, आयात-निर्यातीत झालेली घट यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.
त्यात सुधारणा करण्यासाठी केवळ मलमपट्टी करण्याएवजी दीर्घकाळासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी साेमवारी पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. यामुळे महागाई वाढत आहे.
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी मलमपट्टी करून चालणार नाही तर ठोस पावले टाकावी लागतील. केवळ महागाईच वाढत आहे असे नाही तर देशाची आयात आणि निर्यातही घटली आहे. विक्री स्थिर झाली आहे.
आयात अाणि निर्यात कमी होत आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे. मजबूत अर्थव्यवस्थेसाठी निर्यातच नव्हे तर आयातही ंवाढणे आवश्यक आहे.
सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारला सर्वच आर्थिक बाबींवर लक्ष देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.