कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-भारतातील करोनारुग्णांची संख्या मागील १३ दिवसांत दुप्पट होऊन भारतात १ लाख ३८ हजार ८४५ रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या दहा दिवसांत देशातील रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. लॉकडाउनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे लोक बाहेर पडत आहेत.

तसेच स्थलांतरित श्रमिकांच्या गावी जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे येणाऱ्या दिवसांत करोनारुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्यखात्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

दोन महिन्यांपूर्वी, २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली, तेव्हा भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचशे होती. दोन महिन्यांत त्यात २७७ पटींनी वाढली आहे.

देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ झाली असून त्यापैकी ५७ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ४१.५७ असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार १०३ इतकी आहे.

दहा अव्वल कोरोनाग्रस्त देशांची यादी अमेरिका (१६, ८६,४३६), ब्राझील (३,६५,२१३), रशिया (३,४४,४८१), स्पेन (२,८२,८५२), ब्रिटन (२,५९,५५९), इटली (२,२९,८५८), फ्रान्स (१,८२,५८४), जर्मनी (१,८०,३२८), तुर्कस्तान (१,५६,८२७) आणि भारत (१,३८,८४५)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24