भारत

भारत हादरला ! माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कॅंडल, शेकडो महिलांवर अत्याचार.. नातू जर्मनीला पळाला

Published by
Ahmednagarlive24 Office

संपूर्ण भारत देशात खळबळ उडेल असे मोठे प्रकरण समोर आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केले असल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडालीय. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.

कर्नाटक सरकारने एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली असून प्रज्वल रेवन्ना (MP Prajwal Revanna) हे देश सोडून जर्मनीला पळून गेले असल्याची चर्चा आहे. दरम्यान प्रज्वल रेवन्ना यांनी व्हायरल व्हिडिओमध्ये छेडछाड केली असल्याचे सांगत त्यांनीही तक्रार दाखल केली असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत रेवन्ना
माजी पंतप्रधान आणि JD(S) प्रमुख एचडी देवेगौडा यांचे रेवन्ना हे नातू असून त्यांना सध्याच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA ने त्यांना हसन लोकसभा मतदारसंघातून उभे केलेलं आहे. ते सध्या विद्यमान JD(S) खासदार देखील आहेत.

काय आहे प्रकरण ?
अश्लील व्हिडिओ असणारा एक पेन ड्राईव्ह असून त्यातून हा प्रकार उजेडात आलाय. यादवरे त्यांच्यावर शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातोय. यामध्ये त्यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप देखील केला जात आहे.

प्रज्वल यांच्यावरील आरोपांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहिल्यानंतर एसआयटी चौकशीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हसन जिल्ह्यात पेन ड्राइव्हच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना जबरदस्तीने संबंध ठेवण्यास करण्यास भाग पाडल्याची दृश्ये व्हायरल होत आहेत.

वाद वाढल्यानंतर या तक्रारीची दखल घेत कर्नाटक सरकारने खसदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित लैंगिक छळाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान एचडी देवेगौडा असोत किंवा आम्ही नेहमीच महिलांचा आदर केला असून जेव्हा जेव्हा त्या तक्रारी घेऊन येतात तेव्हा आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी चौकशीचे यापूर्वीच आदेश दिले आहेत. तपास आणि एसआयटीचा तपास सुरू झाला असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केले.

Ahmednagarlive24 Office