भारतीय कर्णधार अडचणीत; जुगार प्रकरणी निघाली नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना यांना केरळ हायकोर्टाकडून बुधवारी नोटीस पाठवण्यात आली. ऑनलाइन जुगारावर बंदी लावण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, तमन्ना भाटिया व मल्याळम अभिनेता अजू वर्गीज या तीनही व्यक्ती ऑनलाइन रमी गेमच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत.

या अनुषंगाने केरळ हायकोर्टाकडून तिघांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. याचिकाकर्ता पाऊली वडक्कन यांच्याकडून आरोप लावण्यात आले होते की, राज्यामध्ये ऑनलाइन जुगाराचा धोका वाढतच चालला आहे.

या जुगाराच्या जाळ्यात मध्यम व निम्नवर्गातील जनता सापडते. राज्यामध्ये यामुळे अनेक घोटाळे झालेले समोर आले आहेत. तसेच विराट कोहली, तमन्ना भाटिया यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती खोटय़ा वचनांद्वारे जनतेला रमीकडे आकर्षित करतात,

पण प्रत्यक्षात असे होत नाही. जनता मूर्ख बनते. याला आळा घालण्यासाठी कायदा बनवणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाइन गेमवरही बंदी घालणे आवश्यक आहे, असेही याचिकाकर्ता पुढे म्हणाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24