अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- भारतीय नौदलाचे मिग -२९ के प्रशिक्षण विमान गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अरबी समुद्रात कोसळले असून एका पायलटला सुखरुप बचावण्यात आले आहे, तर दुसरा पायलट अद्याप बेपत्ता आहे.
भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, दुसऱ्या पायलटसाठी हवाई आणि भूदल युनिटद्वारे शोध सुरू आहे. काल सायंकाळी पाच वाजता हे विमान अरबी समुद्रात कोसळले. “एक पायलट सापडला आहे.
आणि दुसऱ्या पायलटची हवाई आणि भूदल युनिटद्वारे शोध सुरू आहे. घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे भारतीय नौदलाने सांगितले. एका वर्षात मिग २९ केचा हा तिसरा क्रॅश अपघात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved